आशाताई बच्छाव
भौरी शाळेत चिमुकल्यांची वारी
रामनगर– जि प शाळा (भौरी) तालुका देवळा येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी विठ्ठल रखुमाई दिंडी, भजने, अभंग, टाळ मृदुंगाच्या गजरात या कार्यक्रमात चिमुकले विठ्ठल रुक्मिणी व वारकरी यांचा सुंदर पोशाख परिधान केला होता.
सदर कार्यक्रम प्रसंगी वृक्षारोपण, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री बापू सोनवणे, उपाध्यक्ष योगेश सोनवणे ,दिलीप सोनवणे, संजय सोनवणे, नंदू सोनवणे, बाळू सोनवणे,व इतर मोठ्या संख्येने तसेच पालक वर्ग उपस्थित होते. तसेच अंगणवाडी कार्यकर्त्या सौ मंगला सोनवणे, चंद्रभागा शेवाळे, मुक्ता सोनवणे ,उषा सोनवणे, हिरुबाई, शेवाळे,हिरूबाई सोनवणे, शालिनी सोनवणे व शाळेचे मुख्याध्यापक कैलास निकम व शाळेतील उपक्रमशील शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन शीतल पाटील यांनी केली आहे व त्यांना सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.






