आशाताई बच्छाव
राळापेठ जिल्ह्या परिषद शाळेत वीज कोसळून तीन विद्यार्थी किरकोळ जखमी ; विठ्ठलवाडा येथील शेतकऱ्यांचे शेतिउपयोगी साहित्य जळून राख
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
गोंडपिपरी तालुक्यात मेघ गर्जनेसह विजेच्या कडकडाटसह मुसळधार पाऊसाला सुरवात झाली.
विजेने तर कहरच केला. तालुक्यात दोन गावात वीज कोसळली राळापेठ येथिल जिल्ह्या परिषद प्राथमिक शाळेवर वीज कोसळल्याने तीन विद्यार्थ्यां कीरकोळ जखमी झाल्याची घटना दि. ९ जुलै रोजी घडली ही घटना ताजी असतानाच काही वेळातच विठ्ठलवाडा शेत शिवारात चिंचेच्या झाडावर वीज कोसळल्याने झाडाखाली ठेवलेलं सम्पूर्ण शेतीउपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे चाळीस हजाराचे नुकसान झाले.
गोंडपिपरी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली.सकाळ पासून आकशात मेघ दाटले; अंधकार झाला. अचानक मेघ गर्जनेसह विजेचा कडकडाट सुरू झाला.
शनिवार असल्याने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सकाळी सात वाजता भरल्या.येन सुट्टी होण्याच्या वेळात दमदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थी सुद्धा पाऊस थांबण्याची वाट बघत शाळेतच थांबले होते.दरम्यान शाळेच्या इमारतीवर वीज कोसळली. यात तिन विद्यार्थी जखमी झाले. अमर माधव राऊत,राशी विनायक ताजने , निशांत अंगुलमान उराडे
असे जखमी विध्यार्थीचे नावे आहेत. वीज कोसळल्याने शाळेतील सर्व लाईन टीव्ही,पंखे,सर्व विद्युत उपकरणे जळून खाक झाल्याने शाळेचे लाखों रुपयाचे नुकसान झाले
तर विठ्ठलवाडा येथील पुंजाराम पिपळकर यांच्या शेतातिल चिंचेच्या झाडावर वीज कोसळली
झाडालगत झोपडीत ठेवलले २० पाईप , २० खत बॅग ,गुरांचे खाद्य यासह शेतिउपयोगी सर्व साहित्य जळून राख झाल्याने ४० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाकडून
नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.






