Home उतर महाराष्ट्र वासखेडी आरोग्य उपकेंद्राला निवासी डॉक्टर द्या,,ग्रामस्थांची मागणी

वासखेडी आरोग्य उपकेंद्राला निवासी डॉक्टर द्या,,ग्रामस्थांची मागणी

132

आशाताई बच्छाव

IMG-20220707-WA0001.jpg

वासखेडी आरोग्य उपकेंद्राला निवासी डॉक्टर द्या,,ग्रामस्थांची मागणी

वासखेडी/धुळे दिपक जाधव प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क – येथील नवापाडा आरोग्य केंद्रा पैकी वासखेडी उपकेंद्र असुन या उपकेंद्रला चिपलीपाडा, वर्सुस,डोमकाणी,जामकी आदी गावे जोडली असुन ,या उपकेंद्रामध्ये निवासी डॉक्टर असावा,जेणेकरुन येथील नागरीकांचे होणारे वैद्यकिय हाल अडचणीला सामोरे जावे लागते व शहर गाठावे लागते परंतु जर काहीसा प्राथमिक उपचार जर इथे झाला तर पुढील उपचारासाठी तालुका,अथवा जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठवता येते परीणामी त्याचे संकट टळु शकते,परीसरातुन खुप अडचणी येत असता रूग्णांना जागेवर प्राथमिक उपचार मिळत नसल्याने व योग्य वैद्यकिय मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांना खुप आर्थिक स्थितीला सामोरे जावे लागते, परीणामी खाजगी दवाखान्यातून खुप मोठी लुट होतांना देखील बघावयास मिळाते,अशा संकटासाठी आदीवासी भागातील गावात पैसा उपलब्ध होत नसल्याने व योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने जीवांसाठी भटकंती देखील करावी लागते, काहीशी आर्थिक परस्थिती नसल्याने परीणामी आपल्या जीवाचे बलीदान देखील द्यावें लागते,मग शासनाने दिलेली आरोग्य उपकेंद्रे नेमकी कोणत्या कामाची अशी चर्चा रंगु लागते,जर वासखेडी उपकेंद्राला निवासी डॉक्टर मिळाले तर होणारे रोग ,अथवा वैदयकीय संकट दुर होईल अशी अपेक्षा परीसरातुन होत आहे ,अशा परस्थिती त आरोग्य उपकेंद्र असुन त्याचा काय उपयोग ,ही पण एक शोकांतिकाच म्हणावी लागेल,प्रसंगी प्राथमिक उपचार मिळत नसल्याने रूग्णांना आपला जीव देखील गमवावा लागतो,आदीवासी बांधवांची खाजगी रूग्णालयात जाण्याची आर्थिक परस्थिती नसते,अशावेळेस आधार आहे तो फक्त शासकीय आरोग्य केंद्राचा ,परंतु शासनाच्या सुसज्ज बांधकाम असलेल्या अशा उपकेंद्राला जर निवासी डॉक्टर नसेल तर हे उपकेंद्र नावालाच आहे ,असे म्हणावे लागेल, जसे प्रजा विना राजा तसे रूग्णाविना उपकेंद्र हेच म्हणावे लागेल,

Previous articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला मंत्रालयातील दालनातून कामकाजाला प्रारंभ
Next articleसलगरा फाटा ते सलगरा पुलापर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था, तर कर्णा पाटी ते वतापर्यंतचा रस्ता बनला जीवघेणा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.