आशाताई बच्छाव
बिल्लाळी सेवा सोसायटी चेअरमन पदाची निवड जाहीर !
•] चेअरमन पदी पॅनल प्रमुख अच्युतराव पाटील तर व्हाईस चेअरमन पदी विठ्ठलराव इंगळेची वर्णी
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील बिल्लाळी सेवा सहकारी सोसायटीकडे लक्ष लागून राहिलेल्या चेअरमन पदी पॅनल प्रमुख अच्युतराव बापुराव पाटील कदम तर व्हाईस चेअरमन पदी विठ्ठलराव मोहनराव इंगळे यांची एकमताने निवड जाहीर.
मुखेड तालुक्यात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या बिल्लाळी सेवा सहकारी सोसायटी निवडणूकीत एकूण १३ जागे पैकी एकजागा बिनविरोध तर १२ जागेच्या अट्टातटीच्या निवडणूक लढतीत अच्युतराव पाटील यांचे १२ उमेदवार बहुमताने निवडून आले होते.तर दुसरीकडे मात्र माजी जि.प. तसेच चंद्रकांत घाटे यांचा दारुण पराभव झाला होता.
चेअरमन व व्हाईस चेअरमन पदी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.मात्र १५ जुन रोजी निवड प्रक्रिया पार पडुन चेअरमन पदी अच्युतराव पाटील यांची तर व्हाईस चेअरमन पदी विठ्ठलराव मोहनराव इंगळेची निवड झाल्याबद्दल मुखेड पंचायत समिती सदस्य जे.बी. कांबळे , टीव्ही सह्याद्री न्युजचे पत्रकार विठ्ठल पाटील येवतीकर , पत्रकार संजय कांबळे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले असून या निवडीबद्दल चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे सर्व स्थरातुन कौतुक केले जात आहे.






