Home नाशिक राहुड परिसरात वन विभागांतर्गत वृक्षारोपणास कालपासून प्रारंभ

राहुड परिसरात वन विभागांतर्गत वृक्षारोपणास कालपासून प्रारंभ

140

आशाताई बच्छाव

IMG-20220625-WA0013.jpg

राहुड परिसरात वन विभागांतर्गत वृक्षारोपणास कालपासून प्रारंभ
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे
ताहाराबाद वनपरिक्षेत्र विभागा अंतर्गत राहुड या गावाचे जंगल संपत्तीत वाढ व्हावी, यासाठी संबंधित वन विभागाकडून वृक्षारोपणास सुरुवात.
मालेगाव उपविभागीय अधिकारी जे एन. एदलवार यांच्या आदेशान्वये वनपरिक्षेत्र ताहराबाद यांचे अधिकारी शिवाजी सहाने यांच्या मार्गदर्शनाने ताहराबाद वनपरिक्षेत्र विभागांतर्गत विविध ठिकाणी वृक्षारोपणास सुरुवात झाली आहे. प्रथमता राहुड या गावाच्या जंगलासाठी साधारण 40 हजार रोपांची तरतूद करण्यात आली आहे. राहुड या गावाच्या जंगलासाठी जाखोड मध्यवर्ती रोपवाटिका येथून रोपे घेण्यात आली. दिनांक 26 6 2022 रोजी सकाळी रोपवाटिकेत रोपे वाटप करण्याच्या आधी गावाचे ग्रामदैवत व निसर्ग देवता यांना पारंपरिक पद्धतीने वंदन करण्यात आले. पुढे संबंधित गावातून आलेल्या वाहनांमध्ये कांचन, शिसव,बोर, लिंब, करंज,इ रोपे देण्यात आले. संबंधित अधिकारी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या वर्षी बहुतांश गावांचा जंगल संपत्तीत वाढ होईल. या कामी सर्वच वन कर्मचारी सदैव तत्पर आहेत. यात वनपाल पाटील, वनरक्षक सुनील शिर्के,एस.पी.चौरे,देविदास कांबडी, वन मजूर रवींद्र सोनवणे, अभिमन गायकवाड आदी आपले कार्य बजावत आहेत

Previous articleपिंपळगावी ऐतिहासिक स्थळी छत्रपती संभाजी राजेंची भेट
Next articleराम शिंदेंचा विधानपरिषदेतील विजयाबद्दल भिगवणमध्ये जंगी सत्कार (शिंदेंचा सत्काराला झालेली गर्दी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या)
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.