Home नांदेड मनसेची राशनकार्ड साठी कॅम्प राबविण्याची मागणी

मनसेची राशनकार्ड साठी कॅम्प राबविण्याची मागणी

131

आशाताई बच्छाव

IMG-20220622-WA0028.jpg

मनसेची राशनकार्ड साठी कॅम्प राबविण्याची मागणी
————————————-
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड – देगलूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील ३० ते ४० टक्के नागरिकांना एपीएल, बीपीएल, अंत्योदय कार्डधारक असून, त्यांना आज तागायत कोणत्याही प्रकारचे राशन कार्ड वाटप करण्यात आले नाहीत. त्यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजना योजनेचा लाभ मिळत नसल्याने राशनकार्ड वाटप करण्यासाठी तालुक्यातील तहसील कार्यालयात कॅम्प राबवण्याची मागणी, उपजिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांच्याकडे मनसे तालुका अध्यक्ष श्रीकांत काळे यांनी केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सर्व सामान्य नागरिकांना तहसील कार्यालयात कार्ड स्टॉक नाहीत, ऑनलाईन साईड चालू नाही, कागदपत्राच्या जाचक अटी अशा विविध कारणांमुळे नागरिकांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. राशनकार्ड धारकांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळत असतो. मात्र काही नागरिकांकडे राशनकार्ड नसल्याने शासनाच्या योजनेपासून वंचित रहात आहे. मुखेड – देगलूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये राशन कार्ड नसल्याने धान्य ही मिळत नाही. आजारी व्यक्तीस शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना, पंतप्रधान आरोग्य योजना अशा विविध योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे मुखेड देगलूर तालुक्यात तहसील कार्यालयात लाभार्थ्यांना राशन कार्ड वाटप करण्यात यावे अशी मागणी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे मनसेचे तालुका अध्यक्ष श्रीकांत काळे यांनी केली आहे.

Previous articleदोंडाईचा शासकीय आदिवासी वस्तीगृहातील मुलीची आत्महत्येची सी,बी,आय,चौकशीची भिलीस्थान लायन सेनेची मागणी..
Next articleथकीत बिल अभावी वानखेड मधील 140 गाव पाणीपुरवठा योजना आजपासून बंद
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.