Home उतर महाराष्ट्र दोंडाईचा शासकीय आदिवासी वस्तीगृहातील मुलीची आत्महत्येची सी,बी,आय,चौकशीची भिलीस्थान लायन सेनेची मागणी..

दोंडाईचा शासकीय आदिवासी वस्तीगृहातील मुलीची आत्महत्येची सी,बी,आय,चौकशीची भिलीस्थान लायन सेनेची मागणी..

165

आशाताई बच्छाव

IMG-20220622-WA0024.jpg

दोंडाईचा शासकीय आदिवासी वस्तीगृहातील मुलीची आत्महत्येची सी,बी,आय,चौकशीची भिलीस्थान लायन सेनेची मागणी..
वासखेडी/धुळे दिपक जाधव प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क – धुळे जिल्हयातील दोंडाईचा शासकीय आदिवासी मुलींच्या वस्तीगृहातील बांधकाम अभियंताच्या शिक्षणाच्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत असलेल्या १९ वर्षीय तरूणीने गळफास घेत आत्महत्या केल्याने निदर्शनाला आले असता,दिवंगत वैशाली तापिदास गावित असे या मृत आदीवासी मुलीचं नाव असुन ती दोंडाईचा येथील धुळे रस्त्यावर असलेल्या अहींसा इंजिनियरींग काॅलेज च्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती,बुधवारचा दुपारचा २:०० वाजता वैशाली हिचा गणित विषयाचा पेपर देऊन वस्तीगृहात परतली व त्या नंतर ही घटना घडल्याचे समजते या वस्तीगृहातील आत्महत्येची ही दुसरी घटना असुन आधीही या ठीकाणी एका मुलीने आत्महत्या केली होती,त्याबाबतची माहीती ही गुलदस्त्यात च असुन अशा घटना या वस्तीगृहात का घडतात हाच मोठा प्रश्न समोर येतांना दिसतो,या घटनेचा भिलीस्थान लायन सेना दलीत आदीवासी, ओ,बी,सी,मुस्लीम आदी,संघटना न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या संघटनांनकडून जाहीर निषेध केला असुन ,ही हत्या आहे की आत्महत्या याची तात्काळ सी,बी,आय,मार्फत उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींवर कार्यवाही न झाल्यास भिलीस्थान लायन सेना रस्त्यावर उतरेल असे,सौ कुसुमताई सोनवणे यांनी आपल्या निवेदनाद्वारे मा,जिल्हाधिकारी धुळे सो ,यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,सदर निवेदनाच्या प्रती,मा,मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, पोलीस महासंचालक मुंबई म,रा,धुळे जिल्हा पोलीस अधिक्षक,तहसिलदार शिंदखेडा,पोलीस निरीक्षक शिंदखेडा,यांनाही देण्यांत आल्या आहेत,अशी माहीती भिलिस्थान लायन सेना महीला आघाडीच्या धुळे जिल्हा प्रमुख सौ,कुसुमताई सोनवणे यांनी पत्रकान्वये प्रसिध्दीस दिली आहे,

Previous articleप्रहारच्या पाठपुराव्यानंतर कासारे येथील निराधार वैशाली देसले यांना २००००रू,धनादेश नायब तहसिलदार श्री गोपाल पाटील यांच्या हस्ते वितरण..
Next articleमनसेची राशनकार्ड साठी कॅम्प राबविण्याची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.