Home गडचिरोली शिवकल्याण संस्थेच्या वतीने चिमुकल्यांना दिले योगाचे धडे.

शिवकल्याण संस्थेच्या वतीने चिमुकल्यांना दिले योगाचे धडे.

137

आशाताई बच्छाव

IMG-20220621-WA0011.jpg

शिवकल्याण संस्थेच्या वतीने चिमुकल्यांना दिले योगाचे धडे.

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)// नेहरू युवा केंद्र गडचिरोली, शिवकल्याण युथ मल्टिपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन आणि सनराईज स्कूल, गडचिरोली च्या वतीने सामूहिक रित्या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करून चिमुकल्यांना योगाचे धडे देण्यात आले. लहान मुले ही उद्याचा भविष्य आहे त्यामुळे योग्य वेळेत योग्य संस्कार झाले तर उद्याचा भारत सुदृढ आणि निरोगी होऊ शकतो. त्या करिता शिवकल्याण संस्थेच्या वतीने सनराईज स्कूल च्या लहान चिमुकल्यांना योगाचे धडे देऊन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. संस्थाध्यक्ष अनुप कोहळे यांनी योगाचे महत्व पटवून योग प्रात्यक्षिके करून दाखवले. यावेळी सनराईज च्या मुख्याध्यापिका शीतल ठवरे मॅडम, प्रा.दिक्षा रामटेके, प्रा.मीनाक्षी भुरले, प्रा. लीलाताई बोरकर, प्रा.मनीषा झोडे, प्रा.प्रती सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते भूषण कुनघाडकर, रोशन कोहळे, नेहरू युवा केंद्र समन्वयक कैलास वनकावार, गीताताई निलेकर, किरण शेंडे सह अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. लहान चिमुकल्यांना योग प्रात्यक्षिकेसह स्वच्छतेचे देखील महत्व सांगण्यात आले व उपस्थितांना खावू वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous articleआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगा उत्साहात
Next articleदेगलूर येथील सावित्रीबाई फुले शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.