Home नांदेड नांदेड येथील संध्याछाया वृद्धाश्रमात जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध व जनजागृती दिन...

नांदेड येथील संध्याछाया वृद्धाश्रमात जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध व जनजागृती दिन कार्यक्रम संपन्न.

211

आशाताई बच्छाव

IMG-20220620-WA0017.jpg

नांदेड येथील संध्याछाया वृद्धाश्रमात जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध व जनजागृती दिन कार्यक्रम संपन्न.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
संध्याछाया वृद्धाश्रम, मालेगाव रोड, नांदेड येथे जनसेवा फॉउंडेशन, एल्डर लाईन 14567 च्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध व जनजागृती दिन कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणून अडव्होकेट विष्णू गोडबोले यांनी आई वडील, ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम, 2007 या विषयावर माहिती देऊन उपस्थिताना मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रतिबंधासाठी तसेच इतर कुठल्याही समस्याच्या निवारण करिता, मार्गदर्शन, मदत व सहाय्याकरिता एल्डरलाईन 14567 या हेल्पलाईनशी संपर्क साधावा. एल्डर लाईन 14567 ही ज्येष्ठ नागरिकांसाठी अविरत कटिबद्ध आहे सर्वांनी या हेल्पलाईनचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक क्षेत्रीय प्रतिनिधी पांडुरंग मामीडवार यांनी केले तर वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक विक्रम पाटील यांनी आभार मानले.
वृद्धाश्रमातील सर्व कर्मचारी व ज्येष्ठ नागरिक पुरुष महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous articleस्वातंत्र्य दिनापूर्वी ७५ शिबिराद्वारे ७ हजार ५०० दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याचा निर्धार
Next articleअनसिंग येथील ग्रामीण रुग्णालय वाऱ्यावर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.