Home नांदेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री (प दे.) केंद्र राजुरा बु. येथे शाळापूर्व...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री (प दे.) केंद्र राजुरा बु. येथे शाळापूर्व तयारी व पालक मेळावा संपन्न.

109

आशाताई बच्छाव

IMG-20220616-WA0007.jpg

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री (प दे.) केंद्र राजुरा बु. येथे शाळापूर्व तयारी व पालक मेळावा संपन्न.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
दिनांक 15 जून 2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री प. दे. केंद्र राजुरा बु.अंतर्गत शाळापूर्व तयारी,पालक मेळावा, नूतन प्रवेश कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनमंत शिरगिरे, माजी अध्यक्ष हनमंत वडजे, शालेय शिक्षण समितीचे सर्व सदस्य, आरोग्य उपकेंद्राचे डॉ. शीतल जाधव मॅडम, सर्व विद्यार्थी मित्र उपस्थित होते. प्रथम घोषवाक्य देत प्रभातफेरी काढण्यात आली. तदनंतर मेळावा कार्यक्रमाचे उद्घाटन माता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी सर्व मान्यवरांचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, सर्व पालक, सर्व प्रवेशित विद्यार्थी यांचे पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. इयत्ता फिलिममध्ये प्रवेश घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना आनंदमय वातावरणात प्रवेश देण्यात आला. तदनंतर खिचडीचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी गावातील पालक वर्ग व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.