Home गडचिरोली नगर परिषदेची बेफीकीरी उजेडात : नळातून आले मासाचे तुकडे लोकांच्या घरी

नगर परिषदेची बेफीकीरी उजेडात : नळातून आले मासाचे तुकडे लोकांच्या घरी

129

आशाताई बच्छाव

IMG-20220614-WA0067.jpg

नगर परिषदेची बेफीकीरी उजेडात : नळातून आले मासाचे तुकडे लोकांच्या घरी

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : सुरक्षेअभावी पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह पाईपलाईन आढळून आल्यानंतर स्वतः चे कातडे वाचविण्यासाठी सावरासावर करणाऱ्या नगर परिषद प्रशासनाची लक्तरे वेशीवर पडण्याचे थांबता थांबत नसून पाण्याची टाकी स्वच्छ केल्याचा कांगावा करणाऱ्या मुख्याधिकारी विशाल वाघ यांचा फोलपणा दाखवून देणारा प्रसंग आज सकाळी उघडकीस आला आहे.

आज नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने विवेकानंद नगरातील पाण्याच्या टाकीतून पाणी वाटप सुरू केले असता नळाच्या पाण्यासह मासाचे तुकडे काही लोकांच्या घरी पोहचलो. ही बाब महाराष्ट्र माझा चे संपादकांना माहीत होताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता खरोखरच मासाचे तुकडे नळाच्या पाण्यासह आले असल्याचे दिसले. त्यांनी ही बाब मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या लक्षात आणून दिली असता माहिती घेतो,असे उत्तर दिले.

Previous articleडॉ.रविंद्र होळी यांची आपल्या आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ गोंडवाना विद्यापीठाला सुवर्ण पदकासाठी भरघोस देणगी
Next articleखासगी शाळांचा मनमानी कारभार : पालकांनी तक्रारी करण्याचे आवाहन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.