आशाताई बच्छाव
व्यसनमुक्त भारत जनजागृतीसाठी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचे निकाल जाहीर
(३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिन)
मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे
(युवा मराठा न्युज नेटवर्क)
३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिवसानिमित्त अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मुक्रमाबाद यांच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने तंबाखू विरोधी दिनानिमित्य चित्रकला /पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्या स्पर्धेचे आँनलाईन निकाल लातूर जिल्हा प्रकल्प (सलाम मुबंई फाऊंडेशन) समन्वयक शुभांगी लाड यांच्या हस्ते घोषित करण्यात आला.
तंबाखूचे दूष्परिणाम या जनजागृतीपर पोस्टर स्पर्धेस अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी संस्थेतर्फे आवाहन केले होते.तंबाखूचे दुष्परिणाम ह्या विषयावर चित्रकला स्पर्धेत १०७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून या राष्ट्रीय कार्यात सहभाग घेतला.लहान मुलांचे हे जनजागृतीपर बोलके चित्र खूपच कौतुकास्पद आहेत असे मत महादेव खळुरे यांनी व्यक्त केले.
सदरील स्पर्धा निःशुल्क होती.या स्पर्धेतील सहभागी प्रत्येक स्पर्धकाला ई- सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सदरील स्पर्धा दोन गटात होती.
लहान गटातून प्रथम- आयुष्य विजय चव्हाण सातारा,
द्वितीय-कु.धनश्री भगवान हाके नांदेड,तृतीय-श्रेयस दिलीप धामणे हिंगोली तर मोठा गटातून प्रथम-कु.प्रियंका काशिराम कवळकर वाशिम,द्वितीय-कु.दिव्या दीपक लहानकर वाशिम,कु.नंदिनी शंकर वानखेडे वाशिम,तृतीय-विश्व रविंद्र वाकळे औरंगाबाद,कु.प्रिती अनिल व्हटकर सोलापूर तर
उत्तेजनार्थ -कु.मुक्ता संतोष वानखेडे,कु.रोशनी वसंता खंडारे या विद्यार्थ्यांने क्रमांक पटकावला आहे.
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना आँनलाईन व्यासपीठ निर्माण करुन देण्यात आले.सदरील स्पर्धा ही आँनलाईन पद्धतीने राबविण्यात आली.सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ई-प्रमाणपत्र व गुणवंत विद्यार्थ्यांना फोन पे द्वारे रोख रक्कम व गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
वरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी किरण खमितकर, सलिम आतार,बस्वेश्वर थोटे,अविनाश धडे,पद्मा कळसकर,मल्लिकार्जून खळुरे आदिचे सहकार्य लाभले.






