Home नांदेड वाढीव दराने खते विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर तात्काळ कार्यवाही करा –...

वाढीव दराने खते विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर तात्काळ कार्यवाही करा – गिरिधर पा.केरूरकर

150

आशाताई बच्छाव

IMG-20220608-WA0020.jpg

⏹️वाढीव दराने खते विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर तात्काळ कार्यवाही करा – गिरिधर पा.केरूरकर

▶️संबंधित कृषी सेवा केंद्र चालकांवर तात्काळ कार्यवाही करण्याची छावा संघटनेची उपजिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी .
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड – सद्याला शेतकऱ्यांच्या खरीप पेरणीचा हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी
खते व बी. बियाणे घेण्यासाठी गर्दी करित असतानाच दुसरीकडे मात्र कृषी दुकानदारांकडून खते व बियाणे चढ्या दराने विक्री करीत आहेत. सबंधित कृषी अधिकारी व कृषी दुकानदारांची मिलीभगत असल्याचा संशयही शेतकरी वर्गातून केला जात आहे.
केरुर ता. मुखेड येथील युवा शेतकरी भाऊसाहेब हरीचंद्र पाटील शिंदे यांनी मुखेड येथील
ज्ञानेश्वर कृषी सेवा केंद्र, सुनिल कृषी ,व बालाजी कृषी सेवा केंद्र या दुकान मालकांनी मनमानी करुन खतांची ज्यादा भावाने विक्री केली. प्रत्यक्ष भाऊसाहेब हरिशचंद्र शिंदे रा.केरुर हे ज्ञानेश्वर कृषी सेवा केंद्र नवा मोंढा मुखेड येथे खत घेण्यास गेले असता डि.ए.पी खत सुमारे पंधराशे दहा रुपये (१५१० रु ) भावाने पैशाची मागणी केल्याचे व्हिडीओ चित्रीकरण तक्रारदार यांच्याकडे उपलब्ध असून, त्या तारखेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर यांना निवेदन देवून चढ्यादरांने खतांची विक्री करणाऱ्या संबंधित कृषि दुकानदारांची चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करून दुकानांचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.

Previous articleबळीराजा पेरणीसाठी सज्ज; पावसाची प्रतीक्षा
Next articleआमखेडा येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.