Home गडचिरोली डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार अनंतात विलीन हजारो चाहत्यांनी दिला साश्रुनयनांनी निरोप व्रतस्थ स्वयंसेवक...

डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार अनंतात विलीन हजारो चाहत्यांनी दिला साश्रुनयनांनी निरोप व्रतस्थ स्वयंसेवक काळाच्या पड़द्याआड़ : रविंद्र भागवत

109

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220604-WA0066.jpg

डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार अनंतात विलीन

हजारो चाहत्यांनी दिला साश्रुनयनांनी निरोप

व्रतस्थ स्वयंसेवक काळाच्या पड़द्याआड़ : रविंद्र भागवत                                                        गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवि मराठा न्युज नेटवर्क)

राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे माजी विभाग संघचालक तथा चंद्रपूरातील प्रसिध्‍द डॉक्‍टर सच्चिदानंद सांबशिव मुनगंटीवार यांना आज येथील शांतिधाम मोक्ष घाटावर मंत्राग्नि देवून अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार,सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ संदीप मुनगंटीवार यांनी मंत्राग्नि दिला. त्यावेळी अभूतपूर्व जनसागर लोटला होता.

डॉ सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे दिनांक ३ जुन रोजी हृदय विकाराने नागपूर येथील किंग्ज वे रुग्णालयात निधन झाले.त्यांच्या निधनाची वार्ता कळतात राज्यातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांसह हजारो नागरिकांकडून मुनगंटीवार परिवाराचे सांत्वन करण्यात आले.
त्यांंच्या अंतिम दर्शनास राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेते, कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिक आवर्जून उपस्थित होते. प्रामुख्याने चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री विजय वडेटटीवार, खासदार सुरेश धानोरकर , माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर , माजी मंत्री शोभाताई फडणवीस , आ. चंद्रशेखर बावनकुले, आ. अशोक उइके, आ. संजीव रेड्डी , आ. पंकज भोयर , आ. समीर कुणावार , माजी खासदार नरेश पुगलिया , खा अशोक नेते, खा. रामदास तडस, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु प्रशांत बोकारे ,आ. किशोर जोरगेवार , आ देवराव होळी , भाजपचे ज्येष्ठ चंदनसिंह चंदेल , माजी आमदार अतुल देशकर , संजय धोटे , प्रा अनिल सोले , डॉ उपेंद्र कोठेकर , अरविंद शहापूरकर , माजी नगराध्यक्ष राखी कंचर्लावार , डॉ सुरेश महाकुलकर , राहुल पुंगलिया , रामु तिवारी , विनोद दत्तात्रेय , दीपक जयस्वाल , राजीव कक्कड़ , देवराव भोंगळे , डॉ मंगेश गुलवाड़े , राजेंद्र गांधी,राहुल पावडे,हरीश शर्मा , अलका आत्राम , नंदू रणदिवे आदी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गणमान्य व्यक्तिची उपस्थिति होती.

अंत्यसंस्कार झाल्यानंतर रा. स्व. संघाचे नगर संघचालक रविंद्र भागवत यांच्या उपस्थितीत शोकसभा पार पडली. डॉ. मुनगंटीवार यांच्या निधनाने व्रतस्थ स्वयंसेवक काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांचे संघकार्य प्रत्येक स्वयंसेवकासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी होते असेही रविंद भागवत म्हणाले.

Previous articleतुम्ही कधी बघितले आहे का? कलियुगात प्रत्यक्ष देवच पितो दारु!
Next articleधानाला बोनस ऐवजी शेती मशागती साठी एकरी दहा हजार रुपये अनुदान देण्यात यावे – माजी आमदार तथा प्रदेश महासचिव डॉ नामदेव उसेंडी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.