आशाताई बच्छाव
हणेगाव येथे कृषी सेवा केंद्राचा मनमानी कारभार, खते , बियाणे विक्रीवर नियंत्रणाची गरज
चढ्या दराने खते – बियाणांची विक्री ; कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
हवमान खात्याच्या अंदाजानुसार अवघ्या काही दिवसांत मान्सून दाखल होत असल्याचा इशारा मिळाला आहे.खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असुन शेतकऱ्यांनी पेरणीची पुर्व तयारी केली आहे. शेतकऱ्यांकडून खते बियाणे ची मागणी वाढत आहे.देगलूर तालुक्यातील हणेगाव येथील कृषी केद्रांकडुन जादा दराने बियाणांची विक्री करुन शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन खते- बियाणावर नियंत्रण ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. हणेगाव येथील कृषी सेवा केंद्रावर खते व बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची रेलचेल दिसून येत आहे. शेतकऱ्यांचा मुख्य हंगाम असलेला खरीप हंगाम हा जून महिना ते नोव्हेंबर महिना या कालावधीत असतो. या हंगामाची खरी सुरुवात जून महिन्यातील 15 तारखेपासून होते. कारण या कालावधीत मान्सून पूर्णत: सक्रिय झालेला असतो तसेच दमदार पाऊस पडतो म्हणून या वेळेपासून शेतकरी जमिनीमध्ये ैलांच्या साहाय्याने किंवा ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी भौतिक भागानुसार पोषक वातावरणाचा अंदाज घेऊन ज्या क्षेत्रात जी पिके घेतली जातात त्यामध्ये गळीत धान्य व कडधान्य यामधील मूग उडीद सोयाबीन तूर आधी सारख्या वाणांची पेरणी करीत असतो या पेरणी बरोबर शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात. त्याकरिता बियाणे खरेदी करण्याबरोबरच रासायनिक खतांची मागणी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात केली जाते. यावेळी बियाणे व खते शासनाने ठरवून दिलेल्या भावापेक्षा जास्त दराने विक्री करण्यात येतात. यंदा DAP खतांची मुळ किंमत यंदा १ हजार ३५० एवढी आहे तर सध्या हणेगावात १हजार ५०० ते १ हजार ६०० ने विक्री सुरू आहे.तर एका पोत्यामागे २०० ते ३०० रुपये अधिकचे आकारले जात आहेत.देगलूर कृषीविभागाच्या आशीर्वादानेच हणेगाव येथील खते विक्रेत्यांची मनमानी वाढत असल्याची शेतकऱ्यांतून चर्चा पाहवयास मिळत आहे. सध्या शेतीची कामे आटोपून शेतकऱ्यांनी खते व बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगभग सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.यासाठी काही आर्थिक बाजुनी कमी असलेले शेतकरी खरीपाच्या पेरणी साठी कर्ज काढून किंवा आपल्याकडील मालमत्ता गहाण ठेवून रासायनिक खते बियाणे खरेदीसाठी बाजारात शेतकरी दाखल होत आहेत.तर हणेगाव येथील खते विक्रेत्यांनी मनमानी भाव लावून खते बियाण्यांचे विक्री करीत असल्याची चर्चा शेतकऱ्यांतून होत आहे.संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन हणेगाव येथील खते व बियाणे विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवण्याची शेतकऱ्यांतून मागणी होत आहे.






