Home कृषिसंपदा नोकरीतून सेवानिवृती सन्मानाचे जीवन;नामपूरला सेवानिवृती समारंभ उत्साहात साजरा युवा मराठाचे राजेंद्र पाटील...

नोकरीतून सेवानिवृती सन्मानाचे जीवन;नामपूरला सेवानिवृती समारंभ उत्साहात साजरा युवा मराठाचे राजेंद्र पाटील यांची उपस्थिती

280

आशाताई बच्छाव

Screenshot_20220601-065919_Gallery.jpg

नोकरीतून सेवानिवृती सन्मानाचे
जीवन;नामपूरला सेवानिवृती समारंभ उत्साहात साजरा
युवा मराठाचे राजेंद्र पाटील यांची उपस्थिती
जायखेडा,(सुभाष अंकुशे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- आपल्या आयुष्यात नोकरीचा काळ हा मोठ्या दगदगीचा असतो आणि तरीही आपल्या नोकरीच्या कार्यकाळात आपल्या विभागातील अधिकारी ,कर्मचारी व शेतकरी जनतेला आपलेसे करुन घेण्याचे भाग्य क्वचितच व्यक्तीना लाभते असे प्रतिपादन काल (मंगळवार दि.३१ मे) रोजी आयोजीत सेवानिवृती समारंभ कार्यक्रमात नामपूर,ता.सटाणा येथे युवा मराठा न्युजचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांनी बोलताना केले.
कृषी खात्यात ताहराबाद येथे कृषी सहाय्यक या पदावर कार्यरत असलेले श्री.डी.यु.पवार यांच्या नोकरीतील काल सेवासमाप्तीचा अखेरचा दिवस असल्याने सटाणा तालुका कृषी विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास मालेगांव उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप नाना देवरे,तंत्रअधिकारी गोकुळ अहिरे,सटाणा तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार,आसखेडा येथील प्रगतशील शेतकरी अमृत नामदेव कापडणीस आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.नामपूर जवळील नळकेस रोडवरील शेतात या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते.यावेळी कृषी सहाय्यक डि.यु.पवार यांचा सपत्नीक विविध मान्यवरांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम ग्रामविकास अधिकारी सुनील उतमराव पवार व युवा मराठा न्युज टि.व्ही.च्या वृतनिवेदिका दिपाली पवार यांनी घेतलेत.कार्यक्रमासाठी बहुसंख्येने नागरिकांची उपस्थिती लाभली.

Previous article!!पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रभाई मोदी यांच्‍या कार्यकाळाच्‍या अष्‍टवर्षपुर्तीनिमीत्‍त
Next articleअहिल्यादेवी जयंती उत्सव मोठया उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.