राजेंद्र पाटील राऊत
चालत्या वाहनावर बिबट्याचा हल्ला।
कोरची ,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)- नागपुर पेपरगाडी परतीच्या मार्गावर असतांना कुरखेडा- शंकरपुर जंगलात बिबट्याने चालत्या गाडिवर हल्ला केला यात पेपर गाडी चालक प्रकाश बोबडे हे जखमी झाल्याची घटना आज दि. 17 मे रोजी सकाळी 8.30 च्या दरम्यान घडली असुन बिबट्याने चालत्या गाडिवर हल्ला केल्याने बिबट पण जखमी झाला आहे.
प्रकाश बोबडे यांच्यावर विसोरा येथे प्राथमीक उपचार करुन त्यांना पुढिल उपचाराकरीता नागपुरला रवाना करण्यात आले आहे.गाडिवर उजव्या बाजुन बिबट्याने हल्ला चडविला यात वाहण चालकाचा उजवा हात फ्रॉक्चर झाला आहे.