Home सोलापूर बालविवाह रोखण्यासाठी कडक अंमलबजावणी करणार : सातपुते

बालविवाह रोखण्यासाठी कडक अंमलबजावणी करणार : सातपुते

208

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220520-WA0019.jpg

बालविवाह रोखण्यासाठी कडक अंमलबजावणी करणार : सातपुते

युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा चीफ biro.

राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक बालविवाह होत आहेत ते खण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत . जिल्ह्यातील प्रत्येक गावातील नागरिकांनी बालविवाहाला आळा बसविण्यासाठी समोर येणे आवश्यक आहे . बालविवाह रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सोलापूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी सांगितले . काही जिल्ह्यातील गावे ग्रामसेवक मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील ग्रामपंचायत कार्यालयात बालविवाह प्रतिबंधक कायदा यावर जनजागृती शिबिरात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या . बालविवाह रोखण्यासाठी सातपुते यांनी स्वतः नरखेड हे गाव दत्तक घेतले आहे . पोटरे पाटील यावेळी मार्गदर्शन करताना सातपुते म्हणाल्या की , मागील काळात महिला आयोगाचे पदाधिकारी सोलापूर दौऱ्यावर आले असता सोलापूर जिल्हा हा बालविवाह करण्यामध्ये सर्वात पुढे असल्याचे निदर्शनास आले. बाल विवाह रोखण्यात पोलिसांना काही वेळा यश आले तर काही वेळा अपयश आले . बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यातील दोन पेक्षा जास्त बालविवाह झालेली गावे अधिकाऱ्यांना दत्तक देण्यात आली आहेत ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका यांच्यावर जबाबदारी देण्यात आली असून गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यामध्ये जबाबदारीने लक्ष घालणे गरजेचे आहे . मुलींची सुरक्षितता गरजेची असून पालकांनी काळजी करून मुलीचे शिक्षण पूर्ण करून त्यांना ज्या क्षेत्रात ज्यायचे आहे त्यामध्ये करियर करावयाची संधी दिली पाहिजे

Previous articleमोटारसायकल अपघातात एक ठार 2 गंभीर
Next articleवीजनिर्मिती कंपन्याच्या थकबाकीमुळे लोड शेडींग ची वेळ येणार आहे..? केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचा दावा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.