राजेंद्र पाटील राऊत
आम आदमी पार्टीच्या तालुका उपाध्यक्षपदी नागनाथ पाटील पाळेकर तर सचिवपदी नामदेव बोमनवाड
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आम आदमी पार्टी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव इंगळे यांनी मुखेड तालुका आम आदमी पार्टी च्या सचिवपदी नामदेव बोमनवाड तर उपाध्यक्ष पदी नागनाथ पाटील पाळेकर व संभाजी लवटे यांची नियुक्ती केली आहे.
नुकतीच मुखेड येथे आम आदमी पार्टी च्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येउन नांदेड जिल्हा अध्यक्ष श्री कदम यांनी तालुकाध्यक्ष पदी विठ्ठलराव इंगळे यांची निवड केली होती.
आम आदमी पार्टी चे विचार व कार्य तालुक्यातील जनतेपर्यंत पोहोचवून सक्षम राजकीय नेतृत्व देण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी तयार करण्याचे आवाहन करण्यात आले.
या नियुक्ती बद्दल कार्यकर्त्यांत आनंद व्यक्त होत आहे.