Home गडचिरोली चामोर्शीचा पशुधन विकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात। दहा हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ...

चामोर्शीचा पशुधन विकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात। दहा हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक।

123

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220510-WA0010.jpg

चामोर्शीचा पशुधन विकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात।
दहा हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक।
गडचिरोली:,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)  चामोर्शी येथील पशुधन विकास अधिकार्याला दहा हजार रुपयाची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हि कारवाई दिं 10 मे मंगळवारी दुपारच्या सुमारास केली.
सागर पोपट डुकरे वय 32 वर्ष पशुधन विकास अधिकारी वर्ग 1 पशुधन विकास कार्यालय पंचायत समिती चामोर्शी जि.गडचिरोली असे लाचखोर अधिकारी यामचे नाव आहे.याच्याकडे पुूर्वि चामोर्शी पंचायत समिती च्या बिडिओ पदाचा प्रभार होता हे विशेष.
सविस्तर वृत्त असे कि,तक्रारदाराला एक हजार मांसल पक्षी कुक्कुटपालन योजनेअंतर्गत दोन लाख पंचविस हजार रुपये मंजुर करुन लाभ देण्याच्या कामासाठी 9 मे ला पशुधन विकास अधिकारी डुकरे यांनी दहा हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली.परंतु तक्रारदारास लाच देण्याची मुळिच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोली येथील लाचलुचपंत प्रतीबंधक विभागाकडे तक्रार केली.याची पळताडणी लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या तपासी पथकाने केली.पळताडणी अंती 10 मे मंगळवारी दहा हजार रुपयाची लाच घेतांना आरोपी डुकरे यास रंगेहाथ अटक केली.व गुन्हा दाखल केला.
हि कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागपुर परिक्षेञाचे पोलिस अधीक्षक श्री राकेश ओला,अप्पर पोलिस अधिक्षक मंधुकर गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक सुरेंद्र गरड,पोलिस पोलिस उपअधिक्षक यांच्या निरिक्षणात पोलिस निरीक्षक सापळा व तपासी अधिकारी शीवाजी राठोड,सहाय्यक फौजदार प्रमोद ढोरे,पोलिस हवालदार नत्थु घोटे,पोलिस नाईक राजेश पडमगीरिवार,श्रीनिवार संगोजी,पोलिस शीपाई घोरमोड़े चालक वडेट्टीवार,महिला पोलिस शिपायी जोत्स्ना वसाके यांच्या पथकाने केली.

Previous articleशेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे खातेफोड करून घ्यावे आमदार डॉक्टर देवरावजी होळी
Next articleकृषि क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी प्रतिभाताईंचा आदर्श घ्यावा आमदार डॉ देवराव जी होळी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.