Home नांदेड मुखेड तालुक्यातील रस्त्याना भस्मासुरांचे स्वरुप! गोजेगाव ,मुक्रमाबाद ते रावी रस्ता बनला मौत...

मुखेड तालुक्यातील रस्त्याना भस्मासुरांचे स्वरुप! गोजेगाव ,मुक्रमाबाद ते रावी रस्ता बनला मौत का कुवा

138

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील रस्त्याना भस्मासुरांचे स्वरुप!

गोजेगाव ,मुक्रमाबाद ते रावी रस्ता बनला मौत का कुवा

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील गोजेगाव ते रावी हा रस्ता प्रवास करण्यायोग्य राहिलेले नाहीत. या रस्त्याचे कोणत्याही पुढार्यांना देण – घेण असलेल्याचे दिसत नाही. नागरिकांनी वारंवार मागणी करून सुद्धा हा रस्ता खड्डेमयच आहे. हा रस्ता वर्षानुवर्षे तसाच आहे, डागडुजी करून नेमका निधी जातो कुठे याबाबत सर्वच अनभिज्ञ आहेत. कुठे तरी थातुरमातुर खडी, मुरूम टाकून बिले उचलण्याचे उद्योग केले जात आहेत. गुडघाभर पडलेले खड्डे पावसाळ्यापूर्वी व्यवस्थित बनवावेत अन्यथा हा रस्ता पावसाळ्यात पांदन रस्ता होईल ? असे प्रवाशांना वाटत आहे. प्रवास करतानाच्या मरण यातना कधी कमी होतील व हा रस्ता कधी दुरुस्त होईल हाच प्रश्न वाहनधारकांच्या मनात सारखा भिडत आहे.

चौकट
थातुरमातुर दुरुस्त्याही बंद

मागील तीन वर्षांपूर्वी अनेक रस्त्याबाबत टेंडर निघून थातूरमातूर डांबर टाकाले जायचे. मात्र आता हा रस्ता पुर्न उकडुन गेला तरी कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण साहेब या रस्त्याकडे स्वतः लक्ष दिले तर बरे होईल असे जनतेतून बोललं जातं आहे.

चौकट
रस्त्यातच महिला बाळंतीन

गोजेगाव ते रावी पर्यंत हा रस्ता गुडघे भर खड्यातुन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे ‌या खड्ड्यांमुळे महिला रिक्षातच बाळंतीन होण्याच्याही घटना यापुर्वीही घडल्या आहेत. तर रुग्ण दवाखान्यात घेऊन जात असताना मुत्यु झाल्याची घटना घडलेल्या आहेत. हा रस्ता दुरुस्त करून नागरिकांच्या मरण यातना थांबवावेत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

चौकट
तात्काळ रस्ते दुरुस्ती करा अन्यथा तीव्र आंदोलन
मुखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते व गोजेगाव ते रावी पर्यंतचा रस्ता तात्काळ दुरूस्त करण्यात यावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे मुखेड तालुकाध्यक्ष दत्ता पाटील माळेगावे, संभाजी ब्रिगेडचे विधानसभा अध्यक्ष मनोज पाटील बनबरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाअध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर,अनिल पाटील दापके यांनी दिला आहे.

Previous articleगोणार येथे शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न.
Next articleमहाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती? पंतप्रधानांसोबतच्या बैठकीनंतरमास्क मुक्तीचा निर्णय निर्णयाची शक्यता;
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.