Home गडचिरोली नगर परिषद गडचिरोली च्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध!!- आमदार डॉ देवराव होळी

नगर परिषद गडचिरोली च्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध!!- आमदार डॉ देवराव होळी

163

राजेंद्र पाटील राऊत

नगर परिषद गडचिरोली च्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध!!- आमदार डॉ देवराव होळी

गडचिरोली ,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
नगर परिषद गडचिरोली येथे आमदार डॉ देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली आज गडचिरोली शहराच्या विकासासाठी प्रलंबित असलेल्या विविध महत्वाच्या विषयावर नगर परिषद मुख्याधिकारी यांच्यासोबत चर्चा केले व अनेक प्रलंबित समस्यांवर आमदार डॉ देवराव होळी यांनी काही प्रलंबित समस्यांवर थेट मंत्रालय मुंबई येथे सबंधित मंत्रालय सचिव व मुख्य अभियंता यांच्या सोबत सुद्धा थेट संपर्क साधलायावेळी आमदार डॉ होळी यांनी सांगितले
नगर परिषदेने आपल्या मालकीची जमीन ताब्यात घेऊन
त्या ठिकाणी विकासात्मक कामे करून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला लाभ देण्यात यावा व गडचिरोली शहरातील सिटी सर्व्हे करून गोरगरीब जनतेला अतिक्रमित जागेचे पट्टे व घरकुल मंजूर करण्यात यावा व तमाम प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करण्यात यावे तसेच कोणतेही अपूर्ण कामे खपवून घेतले जाणार नाही व विविध कामांबाबत निर्देश दिले ,या बैठकीत नगर परिषद मुख्याधिकारी वाघ साहेब माजी नगर परिषद अध्यक्षा सौ, योगिता ताई पीपरे , भाजप नेते माजी नगरसेवक , प्रमोद पिपरे नगर परिषद माजी सदस्य मुक्तेश्वर काटवे ,उपमुख्याधिकारी रवींद्र भंडारवार , अभियंता अंकुश भालेराव , मैंद ,शिक्षण विभाग प्रमुख ताकसांडे , व पदाधिकारी कार्यकर्ते प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित होते ,