राजेंद्र पाटील राऊत
कै.गंगाधरराव कुंटूरकर यांच्या स्मरणार्थ गडगा येथे पाणपोई सुरु.
नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्युज)
माजी मंत्री तथा नांदेड जिल्ह्यातील राजकिय.सामाजिक कार्यातील उतुंग व्यक्तीमत्व कै.गंगाधररावजी देशमुख कुंटूरकर यांच्या स्मरणार्थ पाणपोई गडगा येथे दि.11 एप्रिल ते 11 जून 2022 साठी सुरु करण्यात आली आहे.
गडगा येथील सेवानिवृत्त शिक्षक शेख बशीर सर यांनी कै.गंगाधररावजी देशमुख कुंटूरकर यांच्या स्मरणार्थ पाणपोई चे आयोजन केले पाणपोई चालवण्याचे नियोजन गडगा येथील सामाजिक कार्यकर्ते मलीकार्जुन भिमाआप्पा व त्याचे कार्यकर्ते रामदास पा.भाकरे,शिंदे माधव,पवळे शिवाजी ,संतोष इबितदार,सुर्यकांतपा.ग्रंथपाल, ईत्यादी.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेशजी देशमुख कुंटूरकर
उदघाटन म्हणून प्रकाशदादा भिलवंडे यांच्या हास्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे सुर्याजी पा.चाडकर जि.प.सदस्य प्रतिनिधी.एकाळे बालाजीराव माजी पाणी पुरवठा अध्यक्ष हे होते.मान्यवरांच्या सत्कारा नंतर प्रास्ताविक भाषण बशीर सर यांनी केले कै.गंगाधरराव देशमुख साहेबांच्या आशिर्वादाने मी घडलो आणि माझी आर्थिक,सामाजिक, राजकीय परिस्थिती सुदारली मी साहेबांचे सामाजिक कार्य खुप चांगले होते म्हणून मि सुद्धा काहीतरी सामाजिक कार्य साहेबांच्या नांवाने सुरु करावे म्हणून विचारात होतो मला पाणपोईचा निर्णय चागला वाटला म्हणून मि हि पाणपोई दि.11/4/2022 ते दि.11/6/2022 पर्यंत चालवणार आहे . बशीर सर यांच्या आनेक उपक्रमाचे गौरव सूर्याजी पा.चाडकर यानी केले प्रकाशदादानी कै.गंगाधरराव देशमुख यांच्या कार्याचे गौरव केले बशीर सरांच्या उपक्रमाचे कौतुक केले अध्यक्षीय भाषणात मा.राजेशजी देशमुख यांनी बशीर सरांनी 33 वर्षे सेवेत कधीही कसुर केली नाही कै.साहेबांच्या सहवासात फारच जवळीकता होती पत्रकारिता, शिक्षक,व कार्यकर्ता आशी ईमेज साहेबांकडे होती.
उपस्थित परीसरातील नागरिक गडगा नगरी चे सरपंच सौ.लक्ष्मी बाई पवळे ,ग्रामपंचायत सदस्य खाज्या कुरेशी ,बालाजी रानडे ,मारोती पांचाळ , रामकिशन बोरीवाले प्रतिनिधी , बाबूराव फुलारी,माजी पं. स.सदस्य गणेश स्वामी डाक पदाधिकारी भाकरे गोविंदराव पाटील उपाध्यक्ष तंटामुक्ती आमलापुरे दिगांबर पा. बापुराव खुजडे ,माळगे राचू पाटील ,महाजन पा ,हारी पाटील आमलापुरे सुधाकर, मन्मत पा अशोक पा.बोगरे खपराळकर बालजी पा.मारोती ताकबिडे , संतोष इबितदार मारोती घोरपडे , सुर्यकांत सावरकर,ईत्यादी.उपक्रमाची परीसरात चर्चा होत आहे.
आभार प्रदर्शन अशोक पाटील आलूरकर यांनी केले.कार्य क्रमाची सांगता सर्वांना स्वादिष्ट खिचडी चे उपहार देण्यात आले.




