Home अकोला खते-बियाणे शेतकऱ्यांना सहज व रास्त दरात उपलब्ध करावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा

खते-बियाणे शेतकऱ्यांना सहज व रास्त दरात उपलब्ध करावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा

161

राजेंद्र पाटील राऊत

खते-बियाणे शेतकऱ्यांना सहज व रास्त दरात
उपलब्ध करावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा

अकोला (सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): -आगामी हंगामात शेतकऱ्यांना खते व बियाणे हे सहज व रास्त दरात उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे तसेच खत तसेच बियाणे विक्री करतांना ज्यादा दराने विक्री, लिंकिंग करून विक्री तसेच अप्रमाणित व निकृष्ट खते बियाणे विक्री होणार नाही, याची दक्षता घ्यावी तसेच गैरप्रकार आढळल्यास नियंत्रण कक्षास तक्रार करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा कृषी निविष्ठा सनियंत्रण समिती निमा अरोरा यांनी आज येथे दिले.

जिल्हा कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांतप्पा खोत, सदस्य सचिव तथा कृषि विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, सहाय्यक आयुक्त कामगार राजू गुल्हाने, जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी, एमएआयडीसीचे ठाकरे, महाबीजचे पिसाळ, अकोला जिल्हा कृषी व्यवसायिक संघाचे उपाध्यक्ष वाटमारे, होलसेलर व डीलर असोशियसनचे प्रतिनिधी, प्रमुख खत कंपनीचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले की, जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती पाहता त्याचा फायदा घेऊन खतांची दरवाढ वा साठेबाजी या शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी खते खरेदी करावी. जिल्ह्यात होणारी खत विक्री ही 100% ई पॉस (e Pos) द्वारेच झाली पाहिजे. तसेच खतांची पोहोच 24तासांच्या आत करण्यात यावी. दिलेल्या आवंटनानुसार सर्व खत कंपनी प्रतिनिधी यांनी जिल्ह्यात खते उपलब्ध करून द्यावी. तसेच तालुका निहाय पुरवठा कृषी विभागाकडून मंजूर करून घ्यावा. जेणेकरून कुठल्याही प्रकारची खत टंचाई निर्माण होणार नाही, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. या बैठकीत खरीप हंगाम 2022 साठी लागणारे बियाणे, खते मागणी, प्राप्त आवंटन, शिल्लक खत साठा, बफर स्टॉक संरक्षीत खत साठा यावर सविस्तर चर्चा झाली. युरिया व डीएपी खतांच्या बफर स्टॉकबाबत तालुकानिहाय गोडाऊन साठवणूक नियोजनाला मंजुरी देण्यात आली. बियाणे उपलब्धते संदर्भात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांकडे स्वतःचे तीन लाख 56 हजार क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध असल्याचे सांगितले. कृषी विभागामार्फत जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथके तसेच नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत,असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Previous articleकंचनपूर शाळेत विद्यार्थी मेळावा संपन्न
Next articleमानव विकास परिषद मालेगाव तालुका महिला ग्रामीण अध्यक्ष पदी सौ. सविता भाऊसाहेब नवले व उपाध्यक्ष पदी रेश्मा अनिल गोसावी यांची निवड करण्यात आली.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.