Home नांदेड नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलिसाच्या बंदोबस्तात निळेगव्हाण येथे महिंद्रा फायन्स कंपनीने ठोकली घराला...

नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलिसाच्या बंदोबस्तात निळेगव्हाण येथे महिंद्रा फायन्स कंपनीने ठोकली घराला शील –सन २०१३ साली घेतले होते दीड लाखाचे कर्ज एक ही हप्ता भरला नसल्यामुळे रक्कम झाली साडे तीन लाखाच्यावर ?

227

राजेंद्र पाटील राऊत

नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलिसाच्या बंदोबस्तात निळेगव्हाण येथे महिंद्रा फायन्स कंपनीने ठोकली घराला शील –सन २०१३ साली घेतले होते दीड लाखाचे कर्ज एक ही हप्ता भरला नसल्यामुळे रक्कम झाली साडे तीन लाखाच्यावर ?
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्युज)

नायगाव तालुक्यातील मोजे निळेगव्हाण येथील रहिवाशी असलेले माधव आनंदा वाघमारे यांच्या घराला कुंटूर पोलिसांच्या बंदोबस्तात महिंद्रा फायन्स कंपनी कडून सन २०१३ वर्षात ऐकून १ लाख ५० हजार रुपये कर्ज घेतले होते परंतु एक रुपयाचा महिंद्रा फायन्सचा हप्ता भरला नसल्यामुळे शील ठोकण्यात आली असल्याची सांगण्यात आले असले तरी धक्का दायक बाब समोर आली असून घराला शील मारणार असल्याची माहिती घर मालकाला झाली असल्यामुळे तो घरातून अगोदरच निघून गेल्याचे सांगण्यात आले असून कुंटूर ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या आदेशानुसार बीट जेमादार एस एम कुमरे, पॉका अशोक घुमे यांनी घराला महिंद्रा फायन्स कंपनी कडून घराला शील मारते वेळेस कांही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सदरचा बंदोबस्त ठेवला असून रितसर बंदोबस्तसाठी महिंद्रा कंपनी कडून मागणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे

तालुक्यातील मौजे निळेगव्हाण येथे रहिवासी असलेले –यांनी महिंद्रा फायन्स कडून घर बांधण्यासाठी कर्ज घेतले होते परंतु नियमानुसार कर्जाची परत फेड झाली नसल्यामुळे अखेर घर मालकावर घराला शिल मारून घेण्याची वेळ आली असल्यामुळे तालुक्यातील पहिलीच महिंद्रा कंपनी कडून शील मारण्याची घटना दिनांक ३ मार्च २०२२ रोजी निळेगव्हाण येथे घडली असून अंदाज वर्तविला जात असला तरी गेल्या दोन वर्षा पासून कोरोना महामारीच्या संकटात सापडलेली जनता आज घडीला फायन्स कंपनी वाल्याची बळी जाताना दिसून येत असून शासनाने या बाबीकडे लक्ष घालून कमीत कमी हप्ते परत फेड करण्यासाठी ग्राहकांला सवलत देण्याची आवश्यकता असली महिंद्रा फायन्स कंपनीने अनेक वेळा पैसे भरण्यासाठी सवलत दिली असल्याचे सांगण्यात आले असून कुंटूर ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जेमादार कुमरे, अशोक घुमे पाटील मॅडम यांनी बंदोबस्त ठेवला आहे

महिंद्रा फायन्स कंपनी कडून निळेगव्हाण येथे घराला शील मरण्याचे वास्तव कारण म्हणजे सन २०१३ साली महिंद्रा फायन्स कडून निळेगव्हाण येथील रहिवासी असलेले माधव आनंदा वाघमारे यांनी कंपनी कडून एक लाख पन्नास हजार रुपये घर बांधण्यासाठी घेतले होते परंतु दीड लाखाच्या रक्कमेसह सन २०१३ ते २०२२ वर्षा पर्यंतची एकूण रक्कम ३ लाख पन्नास हाजार रुपये झाले होते असे महिंद्रा फायन्सचे कर्मचारी टी एम ठाकूर यांनी सांगितले असून या टीम मध्ये नायागांव तहसीलचे व मंडळधिकारी कळकेकर आणि तलाठी कुरुंदकर, तसेच संदीप जैसवाल,बी एन नवीन गडीवार, बी एन बांदे, महोन पांचाळ, कृष्ण कदम, सुनील टाकळे, ॲड जगनाथ आदी वेळी घराला महिंद्रा फायन्स कंपनी कडून शील मारताना उपस्थित होते असे सांगण्यात आले आहे,

Previous articleविधान भवनावर शेतकऱ्यांच्या मागण्या साठी भाजप किसान मोर्चाचा लाखोच्या संख्येने धडक मोर्चा
Next articleलोणी येथील पिडीत कुंटुबाचे पुनर्वसन करा….!! ———मधुकरराव कांबळे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.