Home विदर्भ मार्कंडा यात्रेकरीता गडचिरोली जिल्हा काँग्रेस च्या वतीने मोफत बस सेवा

मार्कंडा यात्रेकरीता गडचिरोली जिल्हा काँग्रेस च्या वतीने मोफत बस सेवा

191

राजेंद्र पाटील राऊत

मार्कंडा यात्रेकरीता गडचिरोली जिल्हा काँग्रेस च्या वतीने मोफत बस सेवा

गडचिरोली: सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क/ कोरोनामुळे दोन वर्षांपासून मार्कंडा यात्रा रद्द करण्यात आली होती. यावर्षी कोरोनाची साथ ओसरत चालल्याने प्रशासनाने मार्कंडा यात्रेकरीता परवानगी दिली. परंतु मागील काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्याने मार्कंडा यात्रेकरीत येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये याकरिता जिल्हा काँग्रेस कमटी, गडचिरोली च्या वतीने गडचिरोली ते मार्कंडा 1 मार्च पासून यात्रा समाप्त होत पर्यंत मोफत बससेवा सुरु करण्यात येणार असून राज्याचे मदत व पुनर्वसन तथा बहुजन कल्याण मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते शुभारंभ होणार असून या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी खासदार तथा जेष्ठ नेते मारोतराव कोवासे, प्रदेश महासचिव तथा जिल्हानिरीक्षक डॉ.नामदेवराव किरसान, माजी आम. डॉ.नामदेवराव उसेंडी, माजी आम. आनंदराव गेडाम, जि.प.उपाध्यक्ष मनोहर पा.पोरेटी, प्रदेश महासचिव पंकज गुड्डेवार, डॉ.नितीन कोडवते, डॉ.चंदा कोडवते, काँग्रेस जेष्ठ नेते माजी.जि.प.अध्यक्ष बंडोपंत मलेलवार, सह निरीक्षक शिशिर वंजारी, शिवा राव, रवींद्र दरेकर, जेष्ठ नेते तथा जि.प.सदस्य अँड.रामभाऊ मेश्राम, हसनअली गिलानी, उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, ता.अध्यक्ष नेताजी गावतुरे, प्रा. राजेश कात्रटवार सह जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली येथून हिरवी झेंडी दाखविण्यात येणार आहे. तरी सदर बसेसचा उपयोग मोठ्या संख्येने मार्कंडा यात्रेकरीता येणाऱ्या भाविकांनी घ्यावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी जनतेला केले आहे.

Previous articleगाडेवाडी, बोरिबेल येथे पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी
Next articleजिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर..!!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.