Home नांदेड दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घ्या . साईनाथ नामवाडे आझाद समाज पार्टीचे तालुका...

दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घ्या . साईनाथ नामवाडे आझाद समाज पार्टीचे तालुका अध्यक्ष साईनाथ नामवाडे यांनी केली मागणी.

158

राजेंद्र पाटील राऊत

दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घ्या . साईनाथ नामवाडे

आझाद समाज पार्टीचे तालुका अध्यक्ष साईनाथ नामवाडे यांनी केली मागणी.

नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्यूज)

यंदाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार असल्याचं नुकतंच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं होतं मात्र दरम्यानच्या काळात आता या परीक्षा नियमित वेळापत्रकानुसार न येता महिनाभर पुढे ढकला अशा सूचना शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू आणि एका कॉन्फरन्समध्ये दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा ऑफलाईन झाली पाहिजे याकरिता अनेक विद्यार्थ्यांच्या सूचना प्राप्त झाल्या त्या सूचना लक्षात घेता माध्यमिक व उच्च माध्यमिक राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या मार्च २०२२ मधील दहावी व बारावीच्या परीक्षा ठरलेल्या दिनांकासह त्याच वेळेत घेण्यात यावे या मागणीचे निवेदन तहसीलदार नायगाव यांना आजाद समाज पार्टीच्या विद्यार्थी मोर्चा चे नायगाव तालुका अध्यक्ष साईनाथ नामवाडे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे
निवेदनावर शुभम मोरे ,रोहित चव्हाण ,प्रशांत बोइनवाड,करण हणमंते , प्रमोद कागडे , सुमित पाटील ,गणेश मदने ,प्रथमेश मालिपाटील ,पंकज शिंदे ,अमोल शिंदे , सुरज तेहरा , वेदांत नर्तावार , दीपक खांडरे आदींच्या सह्या आहेत.

Previous articleस.पो.नि .महादेव पुरी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव वाढदिवसानिमित्त विविध क्षत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा
Next articleआमदार नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.