Home उतर महाराष्ट्र व-हाणे विकासो निवडणूकीत पुन्हा “आपलं पँनल”चे वर्चस्व !

व-हाणे विकासो निवडणूकीत पुन्हा “आपलं पँनल”चे वर्चस्व !

258

राजेंद्र पाटील राऊत

व-हाणे विकासो निवडणूकीत
पुन्हा “आपलं पँनल”चे वर्चस्व !

निमगांव,(विशाल हिरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-व-हाणे,ता.मालेगांव येथील झालेल्या विकासो निवडणूकीत आपलं पँनलने १३ पैकी ८ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला.
२४ जानेवारी रोजी झालेल्या चेअरमन व व्हा.चेअरमन निवडणूकीत आपलं पँनलचे व राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष श्री.अरुण नथु अहिरे यांची चेअरमनपदी निवड झाली.तर व्हाईस चेअरमनपदी सौ.संगिता अशोक पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.चेअरमन पदासाठी माजी चेअरमन व विद्यमान संचालक राजेंद्र तुकाराम पवार यांनी नाव सुचविले तर व्हाईस चेअरमन पदासाठी माजी व्हाईस चेअरमन व संचालक प्रतापसिंग ताराचंद वाघ(सर) यांनी नाव सुचविले.या निवडीप्रसंगी निवडून आलेले संचालक राजेंद्र तुकाराम पवार,प्रतापसिंग ताराचंद वाघ,श्यामा दगा गायकवाड ,साहेबराव कौतीक पवार,भगवान ग्यानदेव खैरनार,बाळू दगा व्हनमणे,प्रशांत पवार,चेतन पवार,प्रशांत शि.पवार,किरण खैरनार,सौ.मंगला पवार हे संचालक उपस्थित होते.

Previous articleकळवणच्या मोकभणगीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
Next articleसोमपूर येथे टंट्यामामा भील जयंतीनिमित्त आरटीओ साहेबांच्या हस्ते प्रतिमा पुजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.