Home नांदेड अंबुलगा मंडळात वादळीवारा गारपीटीसह झालेल्या पावसात रब्बी पिकांचे अतोनात नुकसान.

अंबुलगा मंडळात वादळीवारा गारपीटीसह झालेल्या पावसात रब्बी पिकांचे अतोनात नुकसान.

529

राजेंद्र पाटील राऊत

अंबुलगा मंडळात वादळीवारा गारपीटीसह झालेल्या पावसात रब्बी पिकांचे अतोनात नुकसान.
नांदेड,(मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गेल्या चार दिवसांपासुन नांदेड जिल्ह्याच्या विविध – भागात ढगाळ वातावरण होते . त्यातच दि .१३ जानेवारी रोजी सायंकाळी मुखेड तालुक्याच्या आंबुलगा (बु) सांगवी , ईटग्याळ, बाऱ्हाळी, जाहूर आदीसह काही भागात वादळी वाऱ्यासह तब्बल एक तास गारांचा पाऊस झाला . यामध्ये शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे . · हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार , गेल्या चार दिवसांपासुन तसे सर्वत्र ढगाळ वातावर पसरले होते . काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊसही झाला .यात बाऱ्हाळी परिसरात काल दि . १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास आकाशात ढगांचा गडगडाट होऊन नंतर सलग एक तास पाऊस झाला . अनेक भागात तर वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला . बराच वेळ झालेल्या या पावसामुळे गारांचा सडा पडलेला दिसत होता .
यामुळे शेतातील गुरेढोरे यासह शेतातील रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . रानातील झाडांसह फळझाडांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे .अनेक शेतकऱ्यांच्या तुरीच्या ढिगात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे . रब्बी पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Previous articleगुटखा माफिया Asp पथकाच्या रडारवर! खामगावच्या निलेश राठी नंतर शेगावात टीबडेवाल बंधूंना अटक ; लाखोंच्या मुद्देमाल जप्त
Next articleजिजाऊ जन्मोत्सव मुखेडात उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.