राजेंद्र पाटील राऊत
विनामास्क न फिरता शासनाने केलेल्या आवाहनाचे पालन करणे आवश्यक असल्याचे मत रामतिर्थ पोलिस ठाण्याचे सपोनि विजय जाधव.
नांदेड,( मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):-
सध्या कोरोनाची वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता समूह गर्दी टाळण्यासाठी नागरीकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.विनामास्क न फिरता शासनाने केलेल्या आवाहनाचे पालन करणे आवश्यक असल्याचे मत रामतिर्थ पोलिस ठाण्याचे सपोनि विजय जाधव यांनी केले आहे.
सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसरा लाटेचे आगमन झाले असून दर दिवसा रूग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे अशा परिस्थितीत शासनाने कडक निर्बंध लागू केले आहे कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत दरम्यान सध्या वाढत असलेल्या रूग्ण संख्या अशा परिस्थितीत बाजारपेठ आणि कुठेही सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणे आवश्यक बनले आहे.
रामतिर्थ पोलिस ठाणे हद्दीतील नरसी शहर हे राज्य महामार्गावरील प्रमुख शहर असले तरी जवळपास परिसरातील वीस ते पंचवीस गावांचा दैनंदिन व्यवहारासाठी नागरिकांची येथे वर्दळ होत असते या अनुषंगाने येथील बाजारपेठ नेहमीच गजबजलेली असते यामुळे गर्दी टाळण्यासाठी आपण पुढाकार घेऊन नागरीकांत जनजागृती करण्याची मोहीम हाती घेणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी बोलताना सांगितले दरम्यान येथील व्यापारी बांधवांनी देखील काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगत प्रत्येकांनी मास्क वापरावा कोराना सारख्या महामारीला चार हात दूर ठेवण्यासाठी प्रयत्न प्रत्येकांनी करावेत असे आवाहन देखील त्यांनी केले.




