राजेंद्र पाटील राऊत
शेतकऱ्यांचे खाते होल्ड करण्याचा सपाटा चालु असल्याने बँक मॅनेजरची भेट घेऊन चर्चा….!
जळगाव जामोद.(सतिश पाटील तालुकाप्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) :- आज दिनांक ६ जानेवारी ला भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया ( कृषी ) या शाखांमध्ये जाऊन शेतकऱ्यांची चालू खाते होल्ड करण्याचा सपाटा चालू असल्यामुळे बँक व्यवस्थापक यांची अक्षय भाऊ पाटील व शेतकऱ्यांनी भेट घेऊन चर्चा केली.
गेल्या काही दिवसापासून भारतीय स्टेट बँक या शाखेमध्ये काही शेतकऱ्यांची चालू बचत खाती ही थोड्या_थोड्या अडचणी दाखवत बँकेच्या वतीने होल्ड करण्यात आली.
त्यामुळे ज्या खातेदारांच्या खात्यामध्ये balance आहे. ते सुद्धा त्यांना काढता येत नाही. तर पी एम किसान ची रक्कम असो किंवा शासनाच्या होत असलेल्या मदती ह्या पूर्णतः खाते होल्ड असल्यामुळे निघत नाही.
त्यामुळे चालू असलेले व्यवहार हे बंद पडले.
हा प्रश्न घेऊन शेतकरी खातेदारांनी bank manager यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
यावेळी अक्षयभाऊ पाटील , वैभव जाणे, अजय गिरी, गणेश सिंग परिहार, शिवा पांडे, कैलास निंबाळकर, विनोद पाटील, विष्णू पाटील, अभिमन्यू ईटखेडे, विठ्ठल चव्हाण उपस्थित होते.