Home नांदेड उंद्री प.दे. येथे तीन दिवसीय श्री खंडोबा यात्रा महोत्सव शनिवारी पालखी सोहळा...

उंद्री प.दे. येथे तीन दिवसीय श्री खंडोबा यात्रा महोत्सव शनिवारी पालखी सोहळा तर रविवारी जंगी कुस्त्याचा फड.

351

राजेंद्र पाटील राऊत

उंद्री प.दे. येथे तीन दिवसीय श्री खंडोबा यात्रा महोत्सव
शनिवारी पालखी सोहळा तर रविवारी जंगी कुस्त्याचा फड.
नांदेड /ब्युरो चीफ मनोज बिरादार युवा मराठा न्युज नेटवर्क
तालुक्यातील उंद्री प.दे. येथे श्रीखंडेरायाचा तीनदिवसीय यात्रा महोत्सव सर्व गावकऱ्यांच्या वतीने उत्साहात दिनांक 3 डिसेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान साजरा करण्यात येणार आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी समस्त गावकरी मंडळी उंद्री (प. दे.). ता.मुखेड जि. नांदेड वतीने मल्हारी म्हाळसाकांत भगवान श्री खंडोबा मंदिर वर्धापन दिनाच्या निमित्ताने भव्य यात्रा, जागरण, पालखी सोहळा जंगी कुस्त्यांचा फड व
महाप्रसादाचे आयोजन दिनांक 3 डिसेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे .
तरी सर्व भाविक,व्यावसायिक, व्यापारी व कुस्ती पट्टुंनी उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी.
यात्रा महोत्सवातील कार्यक्रम
दि.03/12/2021 शुक्रवार रात्री ठीक 09:00वाजता जागरण
दि.04/12/2021 शनिवार संध्याकाळी ठीक 06:00 वाजता भगवान खंडेरायाची पालखी मिरवणूक सोहळा
दि.05/12/2021 रविवार सकाळी ठीक 10:00वाजता आरती व महाप्रसाद
दुपारी ठीक 02:00वाजता कुस्त्यांचा फड.
अशा प्रकारे आयोजन करण्यात आले आहे .तरी पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी व यात्रा संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleरायगड किल्ला रायगड रोपवे व परिसर पाच दिवस पर्यटकांसाठी बंद, राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी 🛑
Next articleचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून पती पोलिसांच्या ताब्यात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.