राजेंद्र पाटील राऊत
मुखेड आगार एस.टी.महामंडळ कर्मचारी संपावर बसलेल्या कर्मचाऱ्यांना अ.भा.छावा. संघटनेचा जाहीर पाठिंबा.
मुखेड प्रतिनिधी /मनोज बिरादार युवा मराठा न्युज नेटवर्क
मुखेड. तालुक्यातील एसटी महामंडळाची कर्मचारी दिनांक 28 /10 /2021 रोजी संपावर बसले असता त्यांच्या मागण्या एसटी महामंडळाचे विलिनीकरण झाले पाहिजे गेल्या सात दिवसापासून आंदोलन चालू आहे आहे दिवाळीच्या तोंडावर प्रवाशाचे अतिशय हाल होत आहेत गोरगरिबांना त्रास सहन करावा लागतो खेडोपाड्यातुन दिवाळीच्या बाजारासाठी आठवडी बाजारासाठी गोरगरीब जनतेस त्रास सहन करावा लागत आहे. महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्री.परिवहन मंत्री झोपेचे सोंग घेतले असून त्यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. तरी त्यांना पाठिंबा अ.भा.छावा संघटना मुखेड च्या वतिने आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विनायक पाटील माहेगावकर तालुका अध्यक्ष मुखेड बालाजी पाटील मसलगेकर वाहतूक आघाडी तालुकाध्यक्ष मुखेड गजानन पाटील कापसे.शिवा.संघटना मुखेड.सचिन वडजे शाखा अध्यक्ष मसलगा.बाबा जानी शेख.उपसरपंच सलगरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते.