Home नांदेड मुखेडात सातव्या दिवशीही एस.टी.कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद संप सुरूच मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाचा...

मुखेडात सातव्या दिवशीही एस.टी.कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद संप सुरूच मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाचा पवित्रा ; शासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

338

राजेंद्र पाटील राऊत

मुखेडात सातव्या दिवशीही एस.टी.कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद संप सुरूच

मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाचा पवित्रा ; शासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

मुखेड / प्रतिनिधी मनोज बिरादार युवा मराठा न्युज नेटवर्क

एस.टी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण झाले पाहिजे या प्रमुख मागणी सह राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता दिवाळीपुर्वी देण्यात यावे, वाढीव घरभाडे भत्ता मिळाला पाहिजे, नियमित वेतन तारखेला देण्यात यावे, दिवाळी बोनस १५ हजार रूपये मिळाले पाहिजे यासह विविध मागण्यासाठी दि.२८ आॅक्टोबंरपासुन एस टी कर्मचाऱ्यांचा बेमदुत कामबंद संप सुरु असुन आजतागायत सातवा दिवस उलटला तरीही एस टी कर्मचाऱ्यांचे कामबंद संप सुरूच असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे सणासुदिसाठी बाहेरगावाहून गावाकडे येणारे व मुखेड येथून गावाकडे जाणारे प्रवाशी लालपरी लवकरच प्रवाशांच्या सेवेत सुरु व्हावी या प्रतिक्षेत असुन कर्मचारी मात्र आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाची माघार घेणार नाही असा पवित्रा घेतल्यामुळे आत्ता शासन याविषयी काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सर्पुंण नांदेड जिल्ह्यात एस टी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी दि.२८ आॅक्टोबंर पासून बेमुदत कामबंद संप सुरु करण्यात आले आहे. संपाच्या दुस-या दिवशी एस टी. कर्मचा-यांचे काही मागण्या मान्य झाल्याचे वृत्त कर्मचाऱ्यांपर्यंत आल्यानंतर दि २९ आॅक्टोबंर रोजी काही बसेस रस्त्यावर धावले पंरतु यानंतर राज्यात दोन ठिकाणी एसटी महामंडळ च्या कर्मचा-यांनी आत्महत्या केल्याची बातमी सर्वत्र पसरताच सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी एकत्रित येवुन पुन्हा स्वयंघोषित एसटी.बंदची हाक दिली आणि काम बंद आंदोलन केले आणी सलग सात दिवसापासून सदर संप सुरूच आहे त्यामुळे एैन दिवाळीच्या महत्वाच्या सणासुदिच्या काळात प्रवाशांची तारांबळ उडत असुन एस.टी.चे चाके आगारातच थाबंल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसून येत आहे. नांदेड जिल्ह्यात मुखेड आगार हे सर्वात जुने आगार आहे यात लांब पल्याचे गाडी अधिक धावत असल्याने बस स्थानकात नेहमी प्रवाशांची गर्दी असते या आगारात १४१ चालक १३५ वाहक, ४५ तंत्रज्ञ मेकॅनिक १२ लिपिक लेखा विभाग कर्मचारी असे एकूण ३०० कर्मचारी कार्यरत आहेत ६२ बसेसची संख्या असून दररोज २३ हजार ५६२ किलो मिटर तून ३५८ फेऱ्या द्वारे दररोज सरासरी ०७ लक्ष रुपये उत्पन्न होत असते दिवाळीत हे उत्पन्न चक्क दुप्पट होते.मात्र सात दिवसापासून कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्यामुळे आगाराला आर्थिक नुकसानीचा मोठा फटका बसला असल्याचे समजते त्याचबरोबर पुणे मुंबई हुन गावाकडे दिवाळी साठी परत येणारे प्रवाशी विद्यार्थी कामगार व नौकरी साठी बाहेर असलेले नागरिकांची मोठी गोची होत आहे त्यामुळे या बेमुदत संपाचा तोडगा कधी निघणार आणी एस टी प्रवाशांच्या सेवेत केंव्हा सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.