राजेंद्र पाटील राऊत
(भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा– चणकापूर उजव्या वाढीव कालव्यातून पाणी चोरी. संबंधित यंत्रणेचे पाणी चोरांकडे दुर्लक्ष की आशीर्वाद.
देवळा तालुक्याच्या दुष्काळी पूर्व भागातील गिरणारे, कुंभार्डे, उमराणे, दहिवड, मेशी ,पिंपळगाव,खुंटेवाडी,वाखारी, वाखारवाडी ह्या गावांचा पिण्याचा आणि थोड्याफार प्रमाणात शेतीसिंचनाचा प्रश्न सुटावा यासाठी स्व.डॉ. दौलतराव आहेर यांनी अथक परिश्रम घेत वेळप्रसंगी आंदोलने करत ,शासनदरबारी आपले वजन वापरत चणकापूर उजवा वाढीव कालवा (रामेश्वर धरणापासून पुढे) मंजूर करत कालव्याची निर्मिती केली. परंतु संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे ह्या गावांची तहान भागताना दिसत नाही. दरवर्षीप्रमाणेच ह्यावर्षी देखील पिंपळगाव पासून पुढच्या गावांना सदर कालव्याचे पूरपाणी मिळण्याची शक्यता नाहीच राज्यात सगळीकडेचचालू वर्षी पावसाने थैमान घातले असले तरी दहिवड, मेशी ह्या गावांतील धरणे अजून देखील पूर्ण क्षमतेने भरले नाहीत त्यामुळे भविष्यात ह्या गावांना शेतीसिंचनाच्या प्रश्नाबरोबरच पिण्याच्या पाण्याची देखील टंचाई जाणवणार आहे. असे असताना पाटबंधारे विभागाकडून चणकापूर उजव्या कालव्याला पुरपाणी सोडण्याबाबत बैठक बोलवत ह्या बैठकीत टेल टू हेड पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले परंतु नेहमीप्रमाणेच संबंधित विभागाने फक्त पाणी सोडून दिले की आपली जबाबदारी संपली अशा बेजबाबदार पणामुळे व कालव्याची देखभाल करतांना कुठलाही वचक नसल्याने काही समाजकंटक पुढे पाणी पोहोचण्याच्या आधीच मागे कालवा फोडतात किंवा कालव्याला जागोजागी होल पाडून पाण्याची नासाडी करतात अशा महाभागांवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने गरजू आणि दुष्काळी गावांना पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. त्यातच अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार १५ ऑक्टोबर रोजी हे पुरपाणी बंद करण्यात येणार असल्याने ह्या दुष्काळी गावांना चालू वर्षी देखील पाणी मिळणार नसल्याने चणकापूर उजवा कालवा म्हणजे लाभार्थी गावांसाठी असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.




