Home माझं गाव माझं गा-हाणं मनोर येथील लोकसेवा केंद्र बीरसायत नव्या कार्यालय स्थलांतरीत.

मनोर येथील लोकसेवा केंद्र बीरसायत नव्या कार्यालय स्थलांतरीत.

419

राजेंद्र पाटील राऊत

मनोर येथील लोकसेवा केंद्र बीरसायत नव्या कार्यालय स्थलांतरीत.                                                                      पालघर,(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)-

आदिवासी एकता मित्र मंडळ मनोर मध्ये लोकसेवा केंद्राची स्थापना करून नव्या कार्यालयात लोकार्पण, संघटना अनेक सामाजिक कामात पुढाकार घेत असते,
संघटनेचे काम सुरू झाल्या नंतर असे लक्ष्यात आले की सामान्य माणसाला एखादा अर्ज लिहायचा असेल ,बँकेचा फॉर्म किंवा पावती भरायची असेल,विविध दाखले काढायचे असतील तर पैसे भरून ही कामे करून घ्यावी लागतात.त्यात जातीचा दाखला किंवा तहसीलदार चे तत्सम दाखले कसे काढावेत याची माहिती नसल्याने खूप वणवण सामान्य माणसाला सहन करावी लागत असे ही समस्या ओळखून मंडळाच्या वतीने पाच वर्षां पूर्वी लोकसेवा केंद्र सुरू करण्यात आले.
या लोकसेवा केंद्रात विविध प्रकारचे अर्ज लिहून देणे,बँकेचे फॉर्म – पावती भरून देणे,जातीचा दाखला – उत्पन्न दाखला – रेशन कार्ड – जन्म दाखला – संजय गांधी शाखेतील विविध योजना अशी विविध कामे कुठलेही शुल्क न घेता करून दिली जातात तसेच या कामांचे मार्गदर्शन केले जाते.ही कामे प्रतिदिन साधारण 20 च्या घरात असतात.
आता आपले हे लोकसेवा केंद्र मंडळाचे मुख्य संपर्क कार्यालय बिरसायत येथे स्थलांतरित केले असून त्या ठिकाणाहून ही सर्व कामे केली जात आहेत
संतोष जनाठे विश्वस्त मंडळ व कार्यकारी समिती.

Previous articleसुरगाणा तालुक्यात कृषी अधिकारी शेतात जाऊन करताहेत नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी.
Next articleवीज पडून 12 जनावरे मृत्युमुखी       
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.