Home माझं गाव माझं गा-हाणं सुरगाणा तालुक्यात कृषी अधिकारी शेतात जाऊन करताहेत नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी.

सुरगाणा तालुक्यात कृषी अधिकारी शेतात जाऊन करताहेत नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी.

170

राजेंद्र पाटील राऊत

सुरगाणा तालुक्यात कृषी अधिकारी शेतात जाऊन करताहेत नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी. (युवा मराठा न्युज तालुका प्रतिनिधी -पांडुरंग गायकवाड )
गेल्या आठ दिवसापूर्वी महाराष्ट्रात आलेल्या गुलाब चक्रीवादळाने शेतकरी वर्गाचे खुप मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. सुरगाणा तालुक्यातील सराड या गावात उशिरा का होईना तालुक्यातील कृषी सहायक गायकवाड मॅडम यांनी सराड गावातील नुकसान ग्रस्त शेतीचे पिक पाहणी केली. पाहणी दरम्यान टोमॅटो, सोयाबीन, हलक्या प्रतीचे भात या पिकांचे खुप मोठे नुकसान झालेलं दिसून आले आहे. नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे तर झालेत परंतु त्याची भरपाई शेतकऱ्यांना कधी मिळते यापुढे मात्र प्रश्न चिन्ह आहे. नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे करत असताना कृषी सहायक गायकवाड मॅडम, सराड गावचे पोलीस पाटील कांतीलाल भोये, माजी सरपंच प्रशांत भोये, शेतकरी पांडू हाडस, पंडित भोये, आदी उपस्थित होते.

Previous articleजिल्हा नियोजन समितीची बैठकीत पालकमंत्र्यांची सूचना : जिल्ह्याच्या समस्या सोडविण्यासाठी नियोजन मंडळाचा निधी वापरा!
Next articleमनोर येथील लोकसेवा केंद्र बीरसायत नव्या कार्यालय स्थलांतरीत.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.