राजेंद्र पाटील राऊत
न्यू हायस्कूल येथे विद्यार्थ्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत….
——————————————————-
औरंगाबाद / बबन निकम ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क
शासनाने दिलेल्या आदेशानुसार वैजापूर तालुक्यातील न्यू हायस्कूल तलवाडा येथे पाचवी ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक संजय खरात सर यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. न्यू हायस्कूल तलवाडा हे २२ जूलै पासून नियमित सुरू आहे.परंतू राज्यातील सर्व शाळा आज सुरू करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करत शाळा सुरू आहेत.यात कुठल्याही प्रकारची अडचण नाही,असे मुख्याध्यापक संजय खरात यांनी सांगितले.
यावेळी खरात एस. एस. नाडगौडा, के .एस .अंहकारे आर.एन. शिरसाट टी.व्ही .,गायकवाड एस. आर .,नलावडे ए.ए., जोर्वेकर आर.डी., निकम बि.के.,सैय्यद एच.के,चव्हाण एस.टी. आदींची उपस्थिती होती.