Home कोल्हापूर नवे पारगाव येथे यशवंत सेनेच्या आधारकार्ड मोबाईल लिंकिंग कॅम्प मध्ये 335 नागरिकांनी...

नवे पारगाव येथे यशवंत सेनेच्या आधारकार्ड मोबाईल लिंकिंग कॅम्प मध्ये 335 नागरिकांनी घेतला लाभ           

243

राजेंद्र पाटील राऊत

नवे पारगाव येथे यशवंत सेनेच्या आधारकार्ड मोबाईल लिंकिंग कॅम्प मध्ये 335 नागरिकांनी घेतला लाभ                                कोल्हापूर,(राहुल शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

विद्या मंदिर चांदोली वसाहत नवे पारगाव येथे सोमवार व मंगळवार चांदोली वसाहत आणि बिरदेवनगर येथील 335 नागरिकांचे आधार मोबाईल लिंकिंग मोहीम यशस्वी रित्या करण्यात आले.

यशवंत सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संजय काळे साहेब व पोस्ट ऑफिस यांच्या माध्यमातून हा कॅम्प आयोजित करण्यात आला होता.
या कॅम्प मुळे सर्वसामान्य युवक तरुण माता-भगिनी तसेच वडीलधारी मंडळी वयोवृद्ध नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. तसेच कॅम्प लावल्याबद्दल यशवंत सेना जिल्हा अध्यक्ष संजय काळे साहेब यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सर्व सामान्य जनतेची नाळ जोडणारा सामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व संजय काळे साहेब सामाजिक संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठे काम व सामान्य नागरिकांचे प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून नेहमीच सोडविण्यात अग्रेसर आहेत.
सर्वसामान्य नागरिक यांचा आधार केंद्रामध्ये जाणारा वेळ तसेच तेथील गर्दी पाहून आपल्या गावात कॅम्प आयोजित करण्यात आला आहे व इथूनपुढे ही शासकीय योजनांचे अशाच प्रकारे गावांमध्ये कॅम्प राबविणार असल्याचे मत काळे यांनी व्यक्त केले.
यावेळी उपस्थित पोस्टमन लाड साहेब, पोस्टमन परिट साहेब, यशवंत सेना तालुका उपाध्यक्ष गणपती सिद्ध, राजे ग्रुप अध्यक्ष प्रवीण पाटील, मुख्याध्यापक ठाणेकर सर, पाराशर सोसायटीचे चेअरमन बाबासो मोरे, संजय राऊत, ग्रा प सदस्य नितीन कांबळे, तांबवेंकर मॅडम, कांबळे सर, ग्राम कमिटी अध्यक्ष भगवान काळे, मारुती राऊत,रविंद्र भवड, रमेश लाखन, शरद काटकर, नितीन राऊत, प्रवीण काळे, प्रशांत मोरे (बबलु), अहमद वलगे, मच्छिंद्र पाटील, माणगावे, अरुण थोरात, सचिन चाळके, विशाल बोने, गणेश परबते, विशाल लाखन,दीपक राऊत,रमेश घोलप, महादेव पाटील, प्रकाश गोंडे, विशाल घोलप, सुनील घोलप, इत्यादी
गावातील नागरिक उपस्थित होते तसेच गावातील प्रमुख पदाधिकारी यांनी कॅम्पला भेट दिली.

Previous articleएकाचवेळी महाराष्ट्रातल्या सतरा जिल्ह्यात राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ पदाधिका-यांच्या निवडी!
Next articleपूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तात्काळ ठोस निर्णय घ्या-शिवशंकर पाटील कलंबरकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.