राजेंद्र पाटील राऊत
अकोला: (सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-अकोला शहरातल्या वेगवेगळ्या भागातून दुचकि चोरणाऱ्या टोळीचा उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या विशेष पथकाने कारवाही केली. पथकाने सहा आरोपी अटक करून एकूण 1 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याच्या मागावर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांचे विशेष पथक होते. यामध्ये जुने शहर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्हात मिळालेल्या माहितीवरून पथकाने 6 आरोपीला अटक केली.
फरजिन शेख नदीम अहमद रा.हमजाप्लॉट, उमेर खॉन अजीज खॉन रा.हमजा प्लॉट, शेख सोहब शेख जमीर रा.हमजा प्लॉट, शेख रिहान शेख रशिद रा . नवाबपुरा, शेख मोहीत शेख अजीज रा.मुस्लीम कॉलनी भुसावळ, विधी संघर्ष बालक असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपीच्या ताब्यातून दोन मोटार सायकलचे 1 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांच्या विशेष पथकाचे पोहेकॉ महेन्द्र बहादुरकर, जाकीर खॉन, नापोकॉ.शेख हसन, मोहम्मद नदीम, पोकॉ संतोष गांवडे राज चंदेल, श्रीकांत पातोंड यांनी केली.