Home माझं गाव माझं गा-हाणं मनोर येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा.

मनोर येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा.

255

राजेंद्र पाटील राऊत

मनोर येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा.                            पालघर,(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)

आज ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त क्रांतीसुर्य बिरसा मुंडा चौक मनोर येथे आदिवासी एकता मित्र मंडळाचे वतीने दरवर्षी प्रमाणे कार्यक्रम आयोजित केला होता.कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे कार्यक्रम छोट्या स्वरूपात ठेवण्यात आला होता.या कार्यक्रमापुर्वी दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच मनोर च्या गावदेवी ला श्रीफळ वाढवण्यात आले व आदिवासी एकता मित्र मंडळाचे मुख्य संपर्क कार्यालय येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला.
त्यानंतर प्रत्यक्ष क्रांतीसुर्य बिरसा मुंडा चौकात बिरसा आबा यांच्या फोटो समोर दीपप्रज्वलन केले व श्रीफळ वाढउन कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यात उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले त्यात आदिवासी दिना प्रमाणेच 15 नोव्हेंबर हा क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस आहे त्या दिवसाला राष्ट्रीय जनजाती गौरव दिन म्हणून शासनाने घोषित करावा अशी मागणी करण्यात आली. तसेच ढोलकी वर व इतर गाण्यांवर उपस्थित सर्व आदिवासी समाज बांधवांनी गौरी नाच करून आनंद साजरा केला.या कार्यक्रमाला आदिवासी समाजासोबत अन्य नागरिक बंधू कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

Previous articleजागतिक आदिवासी दिनानिमित बालविद्यार्थीनी दिव्यानीचे कौतुक
Next articleमहाड पूरग्रस्तांसाठी आरोग्य सेवा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.