मानव विकास मिशन योजनेअंतर्गत मुलींना गजानन माध्यमिक विद्यालय तडखेल ता.देगलूर येथे मोफत सायकलींचे वाटप..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज दि.२९/७/२०२१ रोजी मानव विकास मिशन योजने अंतर्गत मुलींना मोफत सायकलीचे वाटप गजानन माध्यमिक विद्यालय तडखेल ता. देगलुर जिल्हा नांदेड येथे करण्यात आले. या प्रसंगी देगलूरचे मा.गटशिक्षणाधिकारी श्री जाधवर साहेब ,शाळेचे मुख्याध्यापक श्री.संजय अटकळे सर यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास मा.सरपंच भीमराव दिंडे, गावातील प्रतिष्ठीत प्रमुख श्री.सुनील शिवकुमार पाटील, प्रमुख पाहुणे श्री.पांचारे सर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आदींसह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.