नानाजी देशमुख कृषी संजीवनी ( पोखरा ) योजने अंतर्गत धनज येथे लोक सहभागीय सूक्ष्म नियोजन कार्यक्रम संपन्न…..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
कृषि विभाग महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँक अर्थसहित नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) प्रकल्पांतर्गत मुखेड तालुक्यातील
धनज येथे आज सामाजिक गाव नकाशा काढुन लोकसहभागातून सूक्ष्म नियोजनाचे कार्यक्रम घेण्यात आला. नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प
(पोखरा),कृषी विभाग महाराष्ट्र शासनान आणी ग्रामपंचायत कार्यालय धनज जामखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुण सरपंच सौ.अनिताताई गोपाळराव मुकदम पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी सहाय्यक विनोद कुमार जोशी उपस्थित होते.नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने कडुन शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध योजना, योजनेचे लाभाचे स्वरुप, पात्रता आणि फायदे याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी गावातील महिला बचत गट,शेतकरी सामाजिक बैठका,शिवार फेरी, शेतकरी लक्ष घटक चर्चा करण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने थेट शेतकऱ्यांच्या
बांधावर जाऊन शेतकरी नागरिकांना योजनेची सखोल माहिती दिली आणी शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावे असे अवाहन केले यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन,आंबा,पेरू,सीताफळ लागवड, सामुहिक बंधारे, नाले बांध,माती बंधारे,सिमेंट बंधारे,शेततळे, विहिरी, कुक्कुटपालन,रेशीम उद्योग,फुल बाग, महिलांसाठी लाकडी घन्ना तेल उद्योग,हळद प्रक्रिया उद्योग,दाळ उद्योग, मिरची कांडप या योजनेची सविस्तर माहिती देऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पोकरा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज करून शेतीला जोडधंद्याची जोड देऊन आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठीचे मोलाची अशी माहिती उपस्थित गावकऱ्यांना
पोखराच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजना व कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणी ग्रामपंचायत कार्यालय धनज/जामखेड यांच्या वत्तीने जास्तीत जास्त लोकांना या योजनेत सहभागी होण्याचे अवाहन करण्यात आले. यावेळी मंचावर कृषी सहाय्यक विनोदकुमार जोशी ,कृषी सहाय्यक आराध्ये,सरपंच सौ.अनिताताई गोपाळराव मुकदम पाटील,समुह साह्यक नितीश हुलबुर्गे सूक्ष्म नियोजन समन्वयक एन.आर कानगुले,ग्रामसेवक ज्ञानेश्वर मंदेवाड,गावातील महिला बचत गटाचे अध्यक्ष,अंगणवाडी ताई महादाबाई वडजे,महिला प्रतिनिधी सुमनबाई पाटील,हंणुमाबाई कोटचिरे,शालुबाई बोडके,सावित्रीबाई पलपवार,चंद्रबाई बोडके,अशा वर्कर ज्योतीताई बोडके,लक्ष्मीबाई अशोक पाटील,प्रयागबाई शेषराव बोडके उपक्रमशील शेतकरी माजी सरपंच गणपतराव पाटील बोडके,शेषेराव पाटील बोडके,हावगीराव पाटील,डॉ.गोपाळ पाटील धनजकर,शिवाजी पाटील दरोडे, मधुकर पाटील बोडके,इंजी.गजानन पाटील,ज्ञानेश्वर पा.बोडके,सदानंद पाटील बोडके,हनुमंतराव पाटील बोडके,ब्रम्हानंद पाटील बोडके,बालाजी पाटील, बालाजी पा.बोडके,माधवराव पाटील,उत्तमराव पाटील,गंगाराम पाटील, दादाराव पा. बोडके,शंकर हाळदे,विठ्ठल बोडके,योगेश पाटील यांच्या सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय पाटील बोडके यांनी केले तर आभार रणजीत जामखेडकर यांनी मानले.