Home उतर महाराष्ट्र देवाची अँग्रो प्रोड्युसर कंपनीचा पायाभरणी शुभारंभ उत्साहात झाला संपन्न…!

देवाची अँग्रो प्रोड्युसर कंपनीचा पायाभरणी शुभारंभ उत्साहात झाला संपन्न…!

327
0

राजेंद्र पाटील राऊत


देवाची अँग्रो प्रोड्युसर कंपनीचा पायाभरणी
शुभारंभ उत्साहात झाला संपन्न…!
नंदुरबार,(सागर कांदळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- मौजे रनाळा ता.जि.नंदुरबार जवळील नंदुरबार तालुक्यातील बायो सीएनजी पीएनजी व सेंद्रिय खत निर्मिती कारखाना अर्थात देवाजी अँग्रो प्रोड्युसर कंपनीचा पायाभरणी सोहळा मान्यवरांच्या हस्ते काल गुरुवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
येत्या काही महिन्यातच हा कारखाना उभा राहणार असून,त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.या कंपनीचे भुमिपुजन अक्षय तृतीया व रमजान ईदच्या शुभदिनी झाले होते.
मौजे रनाळा गट क्रमांक ५०८/१ येथे झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी व मार्गदर्शक कार्तिक रावल सर (मुंबई प्राईम B.D,A.),भरत पाचाने (B,D.A.अहमदाबाद),उपस्थित होते.प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून दिपक गवते (सरपंच रनाळे),दिपक पाटील(M.P.O.शिरपूर), श्याम पाटील(M.P.O.धुळे),दादासाहेब जाधव(M.P.O.येवला),संपतराव लक्ष्मण जाधव(M.P.O येवला),उतम नागरे(M.P.O निफाड),सौ.रेखाबाई बाविस्कर (M.P.O भडगाव),राजेंद्र सोनवणे(M.P.O.चाळीसगांव),सौरभ पाटील (M.P.O.पाचोरा),ओम स्वामीराज प्रोड्युसर कंपनी (M.P.O. साक्री),आनिल कांगणे (कृषी अधिकारी नंदुरबार),भागवत पाटील(ग्रामविकास अधिकारी नंदुरबार),बापू पाटील,रतन ठाकरे,पुरुषोतम काळे,श्रावण चव्हाण,आदी शेतकरी बांधव बहुसंख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here