Home माझं गाव माझं गा-हाणं ना.ना. मुंदडा कृषी उत्पन्न बाजारावर सशस्त्र दरोडा बंदुकीच्या धाकावर 12 लाख लंपास

ना.ना. मुंदडा कृषी उत्पन्न बाजारावर सशस्त्र दरोडा बंदुकीच्या धाकावर 12 लाख लंपास

391

Anshuraj patil

ना.ना. मुंदडा कृषी उत्पन्न बाजारावर सशस्त्र दरोडा
बंदुकीच्या धाकावर 12 लाख लंपास

 

मालेगाव तालुका प्रतिनिधी प्रकाश भुरे
मालेगांव: मालेगांव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ना.ना. मुंदडा कृषी उत्पन्न बाजार समितीवर आज सकाळी सशस्त्र दरोडा टाकण्यात आला असून बंदुकीच्या धाकावर 12 लाख रुपये लंपास केले असल्याची घटना घडली आहे. मालेगांव पोलिस स्टेशन अंतर्गत मोठा दरोडा पडल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
शहरातील आशिष मुंदडा यांनी फिर्याद दिली की मालेगांव पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या नागपूर मुंबई या राज्य महामार्गावरील ना.ना. मुंदडा कृषी उत्पन्न बाजारवर दिनांक 14 जून रोजी सकाळी साडेचार वाजता चे दरम्यान सात ते आठ सशस्त्र दरोडेखोरांनी प्रवेश करून बिहार येथील रोशन कुमार परमानंद ठाकूर या हमाल कर्मचाऱ्यावर बंदूक रोखून दरोडा टाकला आहे. ना.ना. मुंदडा या खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती ही मागील पाच वर्षांपासून कार्यान्वित आहे. आज दिनांक 14 जून रोजी सकाळी साडेचार वाजता चे दरम्यान दोन सुरक्षा रक्षक हे आपले कर्तव्य बजावत होते. दरम्यान कार्यालयाच्या बाजूला झोपलेल्या एका बिहार राज्यातील हमाल कर्मचारी याच्या छातीवर पाय ठेवून बंदुकीचा धाक दाखविला व दोन कार्यालयाचे दरवाजे तोडून आत प्रवेश केला आणि आतील कॅबिन तोडून 2 ऑफिस च्या ड्राव्हर मधील जवळपास 12 लाख 56 हजार रुपय असलेली रक्कम लुटून नेली आणि तिथे असलेला cctv घेऊन गेले असल्याची घटना घडली आहे. मालेगांव पोलीस स्टेशन अंतर्गत गत मोठ्या दरोड्याची ही घटना घडली असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळाला जिल्हा पोलिस अधीक्षकांनी भेट दिली डॉग स्कोड ला सुद्धा आणण्यात आले होते.परंतु डॉग तेथील एका कर्मचारी च्या रूम मध्ये नन्तर रोड वर जाऊन शांत बसले पुढील तपास ठाणेदार आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगांव पोलीस स्टेशन चे कर्मचारी करत आहे.

Previous articleमेंढपाळाच्या हक्कासाठी उग्र आंदोलनाचा इशारा
Next articleशाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्त्वाची माहिती म्हणाल्या.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.