राजेंद्र पाटील राऊत
मेंढपाळाच्या हक्कासाठी उग्र आंदोलनाचा इशारा
कोल्हापूर (राहुल शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
मंगळवार दि.८ जुन २०२१ रोजी गावं महे तालुका करवीर या गावचे मेंढपाळ कृष्णात पुजारी यांच्या मेंढ्या नावाळे मळा येथे रानात बसण्यास होत्या .सकाळी पिल्ली डालुना मेंढ्या चरण्यासाठी घेऊन गेले असता. दुपारी दोनच्या दरम्यान वन्यप्राण्यांनी मेंढ्यांच्या पिल्यावर हल्ला चढवून सुमारे २० पिल्लांचे नुकसान केले .त्यातील एक पिल्लू जागेवरच मरण पावले. तर ८ पिल्ली बेपत्ता आहेत .तसेच ११ पिल्ली अतिशय नाजूक स्थितीत आहेत.यामुळे मेंढपाळाचे सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले . ही घटना समजल्यावर मल्हार सेनेचे सरसेनापती माननीय श्री बबन रानगे साहेब हे घटनास्थळी भेट दिले. तसेच त्यांनी संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांना व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून त्याचा पंचनामा करायला सांगितला. त्यानंतर या घटनेची माहिती मेंढपाळांनी यशवंत सेनेचे संपर्कप्रमुख माननीय डॉक्टर संदीप हजारे यांना कळवली .लगेचच डॉक्टर हजारे साहेब यांनी कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत वाळकुंजे साहेब व करवीर तालुका प्रमुख माननीय श्री संदीप वाळकुंजे यांना सांगितले .त्यांनी आज ताबडतोब घटनास्थळी भेट दिली. तसेच त्यांच्या बरोबर पशुवैद्यकीय अधिकारी कदम मॅडम तसेच जिल्हा परिषद चे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंगळे उपस्थित होते माननीय चंद्रकांत वाळकुंजे यांनी फॉरेस्ट ऑफिसर यांच्याशी फोनवरून चर्चा केली व संबंधित कागदपत्रे व पंचनामा व्यवस्थित रित्या करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले .तसेच शासन पातळीवर योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रयत्न करण्याची शब्द माननीय यशवंत सेना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकात वाळकुंजे साहेब यांनी मेंढपाळस दिला .
घटना घडल्यानंतर घटनेच्या ठिकाणी यशवंत सेना व मल्हार सेना यांचे पदाधिकारी उपस्थित राहून त्या मेंढपाळांस धीर दिल्याने मेंढपाळांनी समाधान व्यक्त केले .व लवकरात लवकर नुसकान भरपाई मिळावी अशी आशा व्यक्त केली.
तसेच या महिन्यात लागोपाठ ही चौथी घटना घडल्यामुळे मेंढपाळांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर ताबडतोब वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या असे निवेदन माननीय चंद्रकांत वाळकुंजे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. तसे न झाल्यास यशवंत सेने तर्फे उग्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला . युवा मराठा न्युजच्या बातम्या जाहिरातीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी संपर्क साधावा.राहुल शिंदे ब्युरो चीफ कोल्हापूर जिल्हा 7498802737 आणि हातकणगंले तालुक्यासाठी तालुका प्रतिनिधी पांडुरंग कुडाळकर 9175432090




