Home कोल्हापूर कोविड तिसऱ्या लाटेसाठी डॉक्टरांनी तयार राहावे ,,,,,, डॉ. पद्मनाभ केसकर

कोविड तिसऱ्या लाटेसाठी डॉक्टरांनी तयार राहावे ,,,,,, डॉ. पद्मनाभ केसकर

467

राजेंद्र पाटील राऊत

कोविड तिसऱ्या लाटेसाठी डॉक्टरांनी तयार राहावे ,,,,,, डॉ. पद्मनाभ केसकर
कोल्हापूर,(राहुल शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
बालकांमध्ये लसीकरण झालेलेले नसल्याने कोरोनाच्या पुढील लाटेत बालके प्रभावित होण्याची दाट शक्यता आहे.उपचाराच्या मर्यादा असल्याने संसर्गच होऊ नये याकरिता फॅमिली फिजिशियननी पालकांचे प्रबोधन करून बालकांवर वेळीच योग्य उपचारासाठी तयार राहणे आवश्यक आहे.असे मत ‘ मी फॅमिली डॉक्टर ‘ मोहिमे अंतर्गत डॉक्टरांसाठी आयोजित वेबिनार मध्ये रुबी हॉल क्लिनिक, पुणेचे इमेर्जेंसी मेडिकल एक्स्पर्ट डॉ पद्मनाभ केसकर यांनी व्यक्त केले. तीनशे हुन अधिक डॉक्टर्स सहभागी झाले होते.
कोरोना महामारीत जनसामान्यांच्या मनामधील वैद्यकीय क्षेत्राबद्दलचे गैरसमज दूर करण्याकरिता फॅमिली डॉक्टरनी पेशंटचे समुपदेशन करणे गरजेचे आहेत. त्यांच्या आजाराचे वेळेत निदान करून आवश्यक त्या वेळेसच,आवश्यक
तपासण्या आणि पुढील उपचाराची दिशा समजावून सांगितल्यास आणि आजाराच्या प्राथमिक अवस्थेतच रुग्णांवर उपचार झालेस जनरल प्रॅक्टिशनर रुग्णाचे शारीरिक आणि आर्थिक नुकसान वाचवू शकतात. डॉक्टरांनी आपल्याकडील रुग्णांचे आजार, तपासण्या, उपचार आणि मार्गदर्शन यांच्या नोंदी आपल्याकडील रजिस्टर मध्ये ठेवणे आवश्यक आहेत. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून रुग्णांवर उपचार केल्यास कायदेशीर बाबीनी डॉक्टर सुरक्षित सेवा देऊ शकतात, असे मत डॉक्टर केसकर यांनी व्यक्त केले.
संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात राबविल्या जात असलेल्या ‘ मी फॅमिली डॉक्टर,,,, एक हात विश्वासाचा ‘ मोहिमे अंतर्गत कोरोना वरील उपचार आणि आपल्या फॅमिली पेशन्ट चे समुपदेशन कसे करावे यासंदर्भात वेबिनारद्वारे तज्ञा मार्फत मार्गदर्शन केले जात आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय जनरल प्रॅक्टिशनर संघटनानी नोंदणी करून लाभ घ्यावा. त्यांच्या विशेष कार्याचा गुणगौरव केला जाणार आहे. असे आवाहन आर्या वेदिक मेडिलाईनचे मोहीम प्रवर्तक डॉ प्रदीप नानासो पाटील आणि संचालक डॉ संदिप अशोक मोहिते यांनी वेबिनार मध्ये व्यक्त केले.