Home नांदेड खा,चिखलीकर साहेबांनी केले रामदासी परिवाराचे सात्वंन

खा,चिखलीकर साहेबांनी केले रामदासी परिवाराचे सात्वंन

315

राजेंद्र पाटील राऊत

खा,चिखलीकर साहेबांनी केले रामदासी परिवाराचे सात्वंन
नायगाव तालुका प्रतिनिधी माधवराव घाटोळे ( युवा मराठा न्यूज नेटवर्क)
शेळगांव (गौरी) ता.नायगांव येथील प्रतिष्ठित जेष्ट नागरिक तथा समर्थ साप्रंदायातील मठ तेर श्रीराम मंदिर विश्वस्त मुरलीधर श्रीधर रामदासी महाराज यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. रामदासी परिवाराचे सांत्वन करण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे लोकनेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यानी केले.

स्व.मुरलीधर महाराज हे सुनिल रामदासी यांचे वडील होते. व सुनिल रामदासी हे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कुटुंबातील सदस्या प्रमाणे सोबत राहातात. स्व.मुरलीधर महाराज रामदासी हे काही दिवसापासून आजारी होते नांदेड येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये विलाज चालु होता स्वतः खा.चिखलीकर साहेब डॉक्टरांना रोज दोन वेळेस विचारपूस करुन घेत होते पण वयोवृद्ध झाल्यानी औषधास शरिर प्रतिसाद मिळत नव्हते.

शेळगांव (गौरी) येथे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, माजी जि.प.सदस्य बालाजीराव बच्चेवार, माजी जि.प.सभापती शिवराज पा.होट्टाळकर, जि.प सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड, जि.प.सदस्य माणीकराव लोहगांवे, डॉक्टर सेलचे नेते डॉ.अजित गोपछडे, भाजपा जिल्हा सरचिटणीस श्रावण पा.भिलवंडे, मारोतीराव वाडेकर, सुभाषराव पवार, पत्रकार सय्यद जाफर, सरपंच प्राचार्य मनोहर तोटरे, उपसरपंच प्रतिनिधी राजेंद्र पा.शेळगांवकर, माजी सैनिक मोहन मेडाबलमेवार, हणमंतराव वाघमारे, सुधाकर पाटील,भाऊसाहेब पाटील, लक्ष्मण कांबळे, नागोराव पाटील,शेषेराव पा,शिंपाळे, नागनाथ पा.शिंपाळे व संतोष देशमुख याची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी रामदासी परिवारातील हदगाव येथील तलाठी नंदकुमार मुरलीधर रामदासी, अंनत मुरलीधर रामदासी, दिलीप मुरलीधर रामदासी, पत्रकार सुनिल मुरलीधर रामदासी, स.भक्त शहाजीबुवा मुरलीधर रामदासी, यज्ञेश रामदासी, पवन रामदासी, कल्याण रामदासी, अथर्व रामदासी, वैभव रामदासी, रघुवीर रामदासी व सुनिल रामदासी याची आई चंद्रकलाबाई मुरलीधर रामदासी यांचे सांत्वन केले.

Previous articleमहाराजा_सयाजीराव_गायकवाड यांचे दतकविधानदिन  २७ मे १८७५
Next articleपरळ येथील महात्मा गांधी रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावे 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.