राजेंद्र पाटील राऊत
इचलकरंजी शहरात कोरोनाबाधितांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता युध्दपातळीवर प्रयत्न युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
कोल्हापूर
इचलकरंजी शहरात कोरोनाबाधितांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता युध्दपातळीवर प्रयत्न
सुरु आहेत. त्यासाठी कामगार कल्याण मंडळाची इमारत कोविड केअर सेंटर म्हणून सुरु करण्यात येणार आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये ३० ऑक्सिजन बेडचे काम अंतिम टप्प्यात आले असून अतिरिक्त बेडसह अन्य सुविधा पुरविण्यासंदर्भात कामगार भवन येथे कामाची पाहणी केली. व लवकरात लवकर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या. लवकरच हे सेंटर कोरोना रुग्णांसाठी सज्ज होणार असून याचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ राहूल आवाडे, आरोग्य सभापती संजय केंगार, ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, पाणीपुरवठा सभापती दिपक सुर्वे, नगरसेवक सुनिल पाटील, बाळासाहेब कलागते, अमित चव्हाण, सुरेश पोवार , सर्जेराव हळदकर, विजय पाटील आदी उपस्थित होते.



