Home पश्चिम महाराष्ट्र उद्योजिका रुक्मिणी खताळ यांचे निधन

उद्योजिका रुक्मिणी खताळ यांचे निधन

220

राजेंद्र पाटील राऊत

उद्योजिका रुक्मिणी खताळ यांचे निधन
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथील हॉटेल जय शंकर च्या मालकीण रुक्मिणी शंकरराव खताळ यांचे अल्पशा आजाराने आज मंगळवारी दुपारी तीन वाजता निधन झाले. मृत्युसमयी त्या 70 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, दोन सुना ,नातवंडे असा परिवार आहे.

रुक्मिणी खताळ यांनी तयार केलेली शेंगा चटणी, डिंक लाडू ,मका पोहे चिवडा सोलापूर जिल्ह्यासह राज्यात, देशातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध झाला होता. जय शंकर हॉटेल च्या माध्यमातून त्यांनी विविध पदार्थ प्रसिद्ध केले होते. लांबोटी गावची ओळख ही जय शंकर हॉटेल च्या नावाने झाली होती.

त्यांना मिळालेले पुरस्कार
रुख्मिणी खताळ याना १९८० साली मेनसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते., महाराष्ट्र वन चॅनल च्या वतीने महिला दिनानिमित्त यशस्वी महिला उद्योजिका व आयकॉन ऑफ सोलापुर ,पुरस्कार देऊन मुंबई येथे सन्मानित करण्यात आले होते. बारामती येथील शारदा प्रतिष्ठानचा “अदर्शमाता” हा पुरस्कार त्याना 8 मार्च 2016 रोजी प्रदान करण्यात आला होता.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे च्या वतीने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने ही त्यांना पुरस्कार देण्यात आला होता.
यशस्वी महिला उद्योजिका आणि आदर्श माता असे त्यांना विविध शेकडो पुरस्कार मिळाले होते. त्यांच्या कार्याची दखल विवीध चॅनेलने ही घेतली होती.

Previous articleग्रामपंचायत कडून अतिक्रमीत जागेवर कारवाई.
Next articleलॉकडाऊनचा निर्णय आठ तासांत मागे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.